🌟जातीच्या आधारावर उमेदवार निवडून येत नसल्याने निवडणुका लढविण्याचा निर्णय मी व्यक्तीगतरित्या घेतला होता - जरांगे पाटील
बिड - राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे सामुहिक उपोषण करणार असल्याची माहिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बिड येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील आले होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत एका जातीच्या आधारावर उमेदवार निवडून येत नसल्याने निवडणुका लढविण्याचा निर्णय मी व्यक्तीगतरित्या घेतला होता. आता निवडणुका झाल्या. सरकार स्थापन होईल असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केले आहे. सर्व समाजाने आपली शेतीतील कामे आटपून आंतरवाली सराटीकडे येण्याचं आवाहन पाटलांनी केले. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत आंदोलन आणि उपोषणावर ठाम असणार असल्याचं देखील पाटलांनी स्पष्ट केले आहे. सरकार कोणाचंही असो... आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहोत असे जारांगे म्हणाले. मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा असा आदेश देखील पाटलांनी मराठा समाजाला दिला.
0 टिप्पण्या