🌟वंचित बहुजन आघाडी उमेदवार सिताराम घनदाट यांच्या प्रचारार्थ उद्या भिमराव यशवंतराव आंबेडकर यांची पुर्णेत जाहीर सभा...!


🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे डॉ.आंबेडकर चौकात आयोजन🌟


पुर्णा (दि.१४ नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राज्याच्या विधानसभेत तब्बल तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्माननीय भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांच्या प्रचारार्थ आयोजित या प्रचंड जाहीर सभेला भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर संबोधित करणार असून या सभेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तमाम आंबेडकरी जनसमुदायासह वंचित बहुजन समाज बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड,वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,माजी नगराध्यक्ष दिलीप हानवते,माजी नगरसेवक दादाराव पंडीत,ॲड.हिरानद गायकवाड,युवा नेते रवी वाघमारे,युवा नेतृत्व राज नारायनकर,सिताराम गायकवाड,इंजिनिअर अमोल किशन गायकवाड यांनी केले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या