🌟राज्यात सत्ता कोणाचीही येवो सत्तेच्या चाव्या मात्र वंचित बहुजन आघाडीकडेच राहणार - भिमराव आंबेडकर


🌟पुर्णेत वंचित आघाडीचे उमेदवार सिताराम मामा घनदाट यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भिमराव आंबेडकर म्हणाले🌟


पुर्णा (दि.१५ नोव्हेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून राज्यात वंचित बहुजन आघाडीने महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभ केल आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात गंगाखेड विधानसभेचे तब्बल तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी बहाल करण्यात आली असून त्यांच्या प्रचारार्थ पुर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.


वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांच्या प्रचार सभेत बोलतांना भिमराव आंबेडकर म्हणाले की राज्यात सत्ता कोणाचीही येवो सत्तेच्या चाव्या मात्र वंचित बहुजन आघाडीकडेच राहणार असून  राज्यात सुरू असलेल्या या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जवळपास पंचवीस ते तीस उमेदवार विधानसभा निवडणुकीत आघाडीवर आहेत वंचित बहुजन आघाडी या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने विधानसभेत पोहोचणार असल्यास दावा भिमराव आंबेडकर यांनी केला असून पुढं बोलतांना ते म्हणाले की गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सिताराम घनदाट हे वंचित आघाडीच्या उमेदवारापैकी सर्वात जास्त मतांनी आघाडीवर राहणार असून त्यांना केवळ धक्का देऊन तुम्ही विधानसभेत पाठवा आम्ही त्यांना आमच्या कोट्यातून मंत्रीपद देतो असे जाहीर वक्तव्य देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले आहे.

पुढे बोलताना भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रासह देशात सत्ताधाऱ्याकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. संविधान बदलण्याची भाषा सत्ताधारी बोलून दाखवत आहेत. यामुळे समाज यावेळी सत्ताधाऱ्यांना जागा दाखवणार आहे. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांचा खुपसून समाचार घेतला. राज्यातील जनता महागाई महिला अत्याचार आरक्षण बेरोजगारी या मुद्द्याने त्रस्त आहे शेतकरी कष्टकरी जनता देशोधडीला लागली आहे. येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा आहे राज्यांमध्ये सत्ता कोणाचीही येऊ वंचित आघाडीच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही सत्तेची फळे चाखता येणार नाहीत त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या घनदाट यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवा गंगाखेड मतदार संघाला आम्ही आमच्या कोट्यातून मंत्रीपद देऊ असेही त्यांनी बोलून वंचित बहुजन आघाडी उमेदवार सिताराम मामा घनदाट यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सभेला माता-भगिनींची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सिताराम मामा घनदाट,त्यांचे नातू अमित घनदाट,परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे,माजी जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,पुर्णा तालुकाध्यक्ष शामसुंदर काळे,माजी नगराध्यक्ष दिलीप हनुमंते,सुनील गायकवाड,माजी नगरसेवक सुनील जाधव,प्रीतम रणवीर, विजय खंडागळे,धाडसी युवा नेतृत्व राजू नारायणकर,सिताराम मामा घनदाट मित्र मंडळाचे शहराध्यक्ष दयानंद कदम,गोपीनाथ तोडणे, ढेले आप्पा,डी.के.पाटील,बुचाले मामा,माजी नगरसेवक शेख चांद,माजी नगरसेवक मगदूम कुरेशी,सलीम भाई, सिताराम घनदाट मामा मित्र मंडळाचे धाडसी कार्यकर्ते बाळू जोगदंड, प्रभूत काळे,चंद्रमुनी लोखंडे,अनिल नारायणकर,सुकेशनी गोधने, अजय काळे,अहमद मिरची वाले,माधव भगत,पाशाभाई रणगडे,मसरत जानी, शेख सिराज,आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

🌟गंगाखेड विधानसभेतील आमदारकीच्या कारकिर्दीत जनसेवेला प्राधान्य दिले पैश्याला नाही - सिताराम मामा घनदाट


गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आपण तीन वेळेस प्रतिनिधित्व केले आहे पैसा माझ्याकडे खूप आहे परंतु तो केंद्रस्थानी न मानता मी प्रत्येकवेळी मतदार संघातील विकासालाच प्राधान्य दिले आहे पूर्णा तालुक्यात गोदावरी नदीवर पूल करून पालम आणि गंगाखेड तालुक्याला जोडले आहे.गावोगावी रस्ते,पाणी,लाईट या समस्या देखील मीच सोडवली आहे. पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव कडे जाणारा २९ कोटी रुपयांचा रस्ता एका उमेदवाराने कागदोपत्री उचलून खाल्ला आहे तसा मी कोणताही पैसा उचलून खाल्लेला नाही आणि खाणारही नाही मी माझे आयुष्य जनसेवेसाठी सार्थकी घातले आहे मतदारांनी मला मतदान रुपी दान देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सितारामजी घनदाट यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या