🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील मी पंचवीस मतांच्या फरकानं विजयी होणार संतोष बागरांना विश्वास 🌟 

💫 एक्झिट पोलचे निकाल समोर येताच महायुती व महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील , संजय राऊत, बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यास सुरु ; राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान, श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान

💫 महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो ;  एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, गुवाहाटी पार्ट-2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचें मोठे वक्तव्य  ;  एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, मी 25000 मतांच्या फरकानं विजयी होणार, संतोष बागरांना विश्वास  

💫 एक्झिट पोल हा फ्रॉड आहे,महाविकास आघाडीला 160-165 जागा मिळू शकतात,संजय राऊतांना विश्वास, म्हणाले 26 ला सरकार स्थापन करणार 

💫 सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलं होतं अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा गौप्यस्फोट ; शरद कोळींनी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे भाजपची बी टीम असल्याचा केला आरोप ; शिंदेनी भाजपसोबत हातमिळवणी केली शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाच्या शरद कोळींची सडकून टीका ;  शरद कोळींच्या विरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक, बांगड्या आणि चपला दाखवत केला निषेध, महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

💫 नागपूरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला ; निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा जमावाचा आरोप 

💫 धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण ; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी

💫 बारामती कोर्टाकडून अजित पवारांना समन्स, 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स ; बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, महादेव जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार

 💫 लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट! ; अदानी जागतिक / जगातील श्रीमंत यादी मधुन बाहेर ; अदानी उद्योग समूहाने लाचखोरी, फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळले, परिपत्रक काढून दिलं स्पष्टीकरण! 

💫 दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा ;

💫 मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका 

💫 शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोल्हापुरातील जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना                                              

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या