🌟पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या जाहीर सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे🌟
परभणी (दि.०८ नोव्हेंबर २०२४) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शनिवार दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ परभणीत दाखल होणार असून परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.राहूल पाटील,पाथरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर,जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार विजय भांबळे,गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणी-जितूर रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे परभणी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.राहूल पाटील व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा मतदारसंघील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुरेशराव वरपुडकर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला परभणी जिल्ह्यातील शिवसेना पक्ष पदाधिकारी तसेच शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या जाहीर सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या