🌟सदरील अनोळखी इसमा संदर्भात कोणाला माहिती असल्यास रामतीर्थ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन🌟
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून भोकर-उमरीला जाणाऱ्या मार्गावर एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा निर्घृणपणे हत्या केलेल्या अवस्थेतले प्रेत आढळले असून रामतिर्थ पोलीसांनी या संदर्भातील कोणी व्यक्ती हरवला असेल तर त्यांनी रामतिर्थ पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरील घटना रामतीर्थ पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली असून आज शनिवार दि.०२ नोव्हेंबर रोजी दिपावलीतील लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडताच नायगाव पासुन भोकर-उमरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून प्रेत आला या संदर्भाची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकासह स्थानिक गुन्हा शाखेचे पथकही घटनास्थळी रवाना झाले असून पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्ष असावे सदरील मृतदेहा जवळ ओळख पटवता येईल असी कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा काही चिन्ह आढळून आले नाही रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असल्याचे समजते.
रामतीर्थ पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की आपल्या घरातील आपल्या आसपासचा कोणी व्यक्ती गायब असेल आणि त्याचा संपर्क होत नसेल तर रामतिर्थ पोलीसांशी संपर्क साधून झालेल्या घटनेतील व्यक्ती गायब झालेला व्यक्ती आहे काय ? याची शाहनिशा करावी.....
0 टिप्पण्या