🌟बिबट्या 🐆 आल्याच्या बातमी मुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण🌟
✍️ शिवशंकर निरगुडे हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील वरदडा शिवारात दि 28/11/2024 रोजी सायंकाळी सात वाजता एका शेतात बिबटय़ा प्राणी आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. त्यासाठी आढळून आलेल्या पायांच्या ठश्यावरून तो बिबट्याच आहे का, याची खात्री केली जात आहे.
🐆 बिबट्या आल्याच्या बातमी मुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण :-
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील वरदडा शिवारात घोरदरी येथील शेतकरी "आसाराम फूपाटे " यांनी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेतातील राहत्या आखाड्याच्या बाजुने मोटर चालू करण्यासाठी जात असतांना हरभराऱ्याच्या शेतात बिबट्या दिवसा आहे त्यामुळे ते घाबरून पळून शेतातील आखाड्यावरुन आजु बाजूच्या आखाड्यावरील शेतकऱ्याला फ़ोन लाऊन माहिती दिली.
बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान, हिवरखेडा येथील पत्रकार शिवशंकर निरगुडे यांनी तातडीने वन विभागालाही याची माहिती दिली. आज दि 29/11/2024 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आसाराम फूपाटे यांच्या आखाड्यावर जाऊन पंचनामा करण्यात आला व त्या शेतातील बिबटय़ाच्या पायाचे ठसे पाहणी करण्यात आले यातून तो बिबटय़ाच असू शकतो असे वन विभागाकडुन सांगण्यात आले आहे
🐆 वनविभागाच्या वतीने त्या परीसरात पाहणी सुरू :-
आज वनविभागाच्या वतीने वन परीक्षत्र अधिकारी माधव केंद्रे वनपाल जी एस साठे व वनरक्षक ढगे सर .व वनमजूर डी वाय काळे होडेबे वनविभाग कर्मचारी यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून माहिती घेतली. घटना स्थळाजवळ व काही अंतरावर प्राण्याच्या.पायाचे ठसे आढळून आले. या ठश्यांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो प्राणी बिबट्याच आहे असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जातांना काळजी घ्यावी एकटे शेतात जाऊ नका असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या