🌟परभणीत प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी ०५ डिसेंबर रोजी कै.ह.ब.दळवी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.....!


🌟प्रथम विजेत्यास २००१,द्वितीय १५०१ तर तृतीय विजेत्यास १००१ तर उत्तेजनार्थ ५०१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार🌟 

परभणी (दि.३० नोव्हेंबर २०२४) : परभणी येथील नूतन विद्या समितीद्वारे प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी कै.ह.ब. शदळवी स्मृतिदिनानिमित्त ०५ डिसेंबर २०२४ रोजी विभागीय शालेय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा परभणीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

             नूतन विद्या समितीच्या शिवाजी नगरातील मराठवाडा हायस्कूलच्या रुद्रावतार मदनलाल धिंग्रा सभागृहात ०५ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता या वक्तृत्व स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष, मराठी आमची गौरवशाली राज्यभाषा व गोमाता-राज्यमाता हे तीन विषय स्पर्धकांसाठी असणार आहेत. प्रथम विजेत्यास २००१,द्वितीय १५०१ तर तृतीय विजेत्यास १००१ तर उत्तेजनार्थ ५०१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक विद्यार्थ्यास ०५ मिनीटे वेळ दिला जाणार आहे एका शाळेतून दोनपेक्षा अधिक स्पर्धक असू नयेत,विषयाची मांडणी मराठी भाषेतूनच करावी लागणार आहे.५० पेक्षा अधिक स्पर्धक झाल्यास स्पर्धा ०६ डिसेंबर म्हणजे दुसर्‍या दिवशी घेण्यात येईल. स्पर्धकांनी ०३ डिसेंबर पर्यंत स्पर्धा संयोजक गोपाळ रोडे (9028149855) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी.

            या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन नूतन विद्या समितीचे चिटणीस संतोष धारासूरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे व स्पर्धा संयोजक गोपाळ रोडे यांनी केले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या