🌟रेल्वे उड्डाणपूलाच्या दर्जाहीन बांधकामाचा निकृष्ट दर्जा लपवण्याची बांधकाम गुत्तेदार कंपनीने लढवली अनोखी शक्कल🌟
पुर्णा (वृत्त विशेष - चौधरी दिनेश रणजित) :- पुर्णा शहरातील पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात महारेल (एमआयआरडीसी) अंतर्गत मागील पाच वर्षांपूर्वी रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी वाजतगाजत सुरुवात करण्यात आली होती सदरील रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम दोन/तीन वर्षाच्या कालावधीत पुर्ण होऊन सदरील रेल्वे उड्डाणपूल रहदारीसाठी खुल्ला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम कंपन्यांसह भारतीय रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला तब्बल पाच वर्षे तीन महिन्यांचा कालावधी उलटला व एम/एस डिसीएस - पि.व्ही.राव (जेव्ही),गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली हैदराबाद,महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या तीन गुत्तेदार कंपन्यांनी ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या विकासनिधीतून होणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम हाती घेतल्यानंतर देखील आतापर्यंत काम पुर्णत्वास गेले नाही त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे अत्यंत कासवगतीने होत असलेल्या या दर्जाहीन बांधकामाकडे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वे प्रशासनाच्या कॉलेटी कंट्रोल विभागाचे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संबंधीत बांधकाम गुत्तेदार कंपन्यांनी रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम अंदाजपत्रका प्रमाणे न करता अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन करण्यास सुरुवात केली असून या रेल्वे उड्डाणपूलाच्या साईट वॉलच्या बांधकामात आडव्या रॉडचा वापर अंदाजपत्रकानुसार न करता अत्यत दर्जाहीन व कमकुवत बांधकाम केले जात असून उड्डाणपूलाच्या स्लॅपसह साईट वॉलच्या आसपास मोठमोठे भगदाड (खड्डे) पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी दगड चुरीसह सिमेंट वापरून निकृष्ट काम लपवले जात असून अर्धवट बांधकामाला रंगरंगोटी करून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे काम बांधकाम गुत्तेदार कंपन्यांनी सुरू केले आहे.
नांदेड-हिंगोली-परभणी या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या व मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह माल वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची वाहतूक असणाऱ्या या पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूलाचे होणारें निकृष्ट व दर्जाहीन बांधकाम भविष्यातील फार मोठ्या धोक्याचे संकेत देत असून वेळीच या रेल्वे उड्डाणपूलाचे होणारें निकृष्ट बांधकामाची चौकशी करुन बांधकामाचा दर्जा सुधारला नाही तर भविष्यातील भयंकर दुर्घटनेस सर्वार्थाने नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारीच जवाबदार राहतील यात तिळमात्र शंका नाही......
0 टिप्पण्या