🌟हिंगोली जिल्ह्यातील तुरीवर अळीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव : शेतकरी चिंतेत....!


🌟मर रोगाने तुरीचे पिक पूर्ण जातेय वाळून : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान🌟 


✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खरिपातिल सततच्या पावसाने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठें नुकसान झाले आहे व आत्ता मर रोगाने तुरीचे पिक पूर्ण वाळून जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठें नुकसान होत आहे.


मागील काही वर्षांपासून तूर पिकावर रोग पडत असल्यामुळे उभी पीक वाळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरी लागवडीकडे पाठ फिरविली होती. यंदा तुरीला चांगला दर मिळत असल्यामुळे शिवारात तुरीचे क्षेत्र वाढले आहे. परंतु सध्या ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या तुरीवर संकट घोंगावत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असून, विविध कीटकनाशकांची फवारणीवर शेतकरी भर देत असल्याची स्थिती दिसून येत आहे. खरीप हंगामातील दीर्घ मुदतीचे तूर पीक शेतकऱ्यांना अर्थचक्राच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. हे पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे . त्यातच वेळोवेळी ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सेनगाव तालुक्यात साखरा, हिवरखेडा, धोतरा, खडकी, यासह अनेक गावात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान झाले होते. आता सर्व आशा ही तुरीवर होती मात्र या पिकावर नवे संकट आले आहे. विविध पिकांना पावसाळ्यात जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यानंतर खरिपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पिक बहरलेले असताना त्यावर कीड व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीचे पीक उधळत आहे.

*शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कृषी विभागाने मार्गदर्शक करावे :-

सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात अळीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना  कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सध्या इतरत्र शेतमालाच्या तुलनेत तुरीला हमीभाव व बाजारभाव चांगला आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून शेतकरी तूर पिकाला प्राधान्य देतात. मात्र, सध्या सोयाबीन पीक हातचे गेले, कापसाचेही उत्पादन घटले. आता तूर, रब्बी पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा असताना मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमधून विविध कीटकनाशकांच्या फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र, कृषी विभागाकडून कीड रोगाच्या व्यवस्थापनाविषयी करण्याची मार्गदर्शन करण्याची  मागणी शेतकऱ्यांना कडुन होत आहे.

*प्रतिक्रिया*

🌟कृषी विभागाने जर वेळेवर मार्गदर्शन केले असते तर आम्ही त्यावर उपाय योजना केली असती :-

माझ्या दोन एकर शेतातील तुरीचे पिक वाळून जात आहे आत्ता तुरीला मोठ्या प्रमाणात फूलधारना झाली आहे व शेंगा देखील लागल्या आहे या अवस्थेत पण पूर्ण पणे तुरीचे पिक वाळून जात आहे या संदर्भात कृषी विभागाने जर वेळेवर मार्गदर्शन केले असते तर आम्ही त्यावर उपाय योजना केली असती काही आधी सोयाबीन अतिवृष्टीमुळे गेले आत्ता तूर मर रोगाने वाळून जात आहे आणि आत्ता पर्यन्त आम्हाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देखील मिळाली नाही आणि पिक विमा देखील मिळाला नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी 

*दत्तराव निरगुडे मु.पो.हिवरखेडा ता सेनगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या