🌟आशीर्वाद जनतेचा गती विकासाची गंगाखेड मतदार संघाच्याच उज्ज्वल भवितव्याची : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संकल्प🌟
पुर्णा (दि.१६ नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश देशमुख (सोनटक्के) यांनी आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये झंझावती प्रचार दौरा काढून सुजाण मतदारांच्या भेटीगाठी घेत मतदार बांधव माता भगिनी व नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जनसामान्यांच्या अपेक्षा आणि गरजांवर आवर्जून चर्चा केली.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांशी साधलेला संवाद व विकासा संदर्भात केलेल्या चर्चेमुळे हा दौरा आणखी विशेष ठरला. त्यांच्या समस्यांमध्ये पायाभूत सुविधा,जलसंधारण,आणि शेती यांसारख्या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली त्यांच्या मागण्या आणि गरजा ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश देशमुख (सोनटक्के) यांच्याकडून ग्रामीण भागातील मतदार जनतेला देण्यात आले यावेळी बोलतांना मनसे उमेदवार रुपेश देशमुख (सोनटक्के) म्हणाले की एकदा मला विधानसभेत जाण्याची संधी द्या मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे अभिवचन तुम्हाला देतो असेही ते यावेळी म्हणाले.....
0 टिप्पण्या