🌟हदगाव मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना उबाठा पक्षावर गंभीर आरोप केले होते🌟
नांदेड :- हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेना उबाठा पक्षाने आज शनिवार दि.०९ नोव्हेंबर रोजी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडे नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दाखवून पक्ष नेतृत्वाकडे विधानसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती परंतु पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे नाराज झालेल्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना उबाठा गटावर उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोप करत पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला यांची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेत मा.खा.सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली.
मागील काळात शिवसेनेचे तीन वेळा आमदार व एक वेळ खासदार राहिलेले सुभाषराव वानखेडे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक हिंगोलीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली तरीही त्यांचा पराभव झाला शिवसेना फुटल्यानंतर वानखेडे ठाकरे गटात सामील झाले होते.
🌟शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर माजी खासदार सुभाष वानखेडे काय म्हणाले :-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असो किंवा पद असो जिल्हा तालुकाप्रमुख पदी निवड आसो पैशाचा व्यवहार करून पदे दिले जातात हाच प्रश्न त्यांना मी विचारला होता हे जे चाललंय ते चुकीचा आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते गेले विस विस वर्षे काम करत आहेत पक्ष वाढीसाठी काम करत आहेत अशा कार्यकर्त्याला उमेदवारी न देता अवघ्या पाच तासात बाहेरचा उमेदवार आणायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलायचा हा प्रश्न त्यांना विचारल्याने माझी पक्षातून हकालपट्टी केली आहे....
0 टिप्पण्या