🌟अडचणीच्या काळात पिंपळगाव लिखा येथील भगवान मोरे यांना ०३ लाखांचा धनादेश केला प्रदान🌟
पुर्णा (दि.१९ नोव्हेंबर २०२४) :- पुर्णा येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे इन्शुरन्स अधिकारी बाहुबली इंदलवार क्षेत्र अधिकारी राजेंद्र चौरिया,शिवराज लाखावर या अधिकाऱ्यांच्या तत्पर व समर्पित सेवेमुळे पिंपळगाव लीखा येथील श्री भगवान गोपीनाथ मोरे यांना इन्शुरन्स पॉलिसीचा सुमारे तीन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला त्यांनी एसबीआय लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी लोन घेताना घेतली होती.
दरम्यान त्यांच्या कानावर शस्त्रक्रियेसाठी त्यांना पैशांची अडचण असताना पुर्नेतील एसबीआय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून त्यांना आज रोजी थेट 3लाखांचा धनादेश प्रदान केला. त्यांचा 10502रुपयांची sbi जनरल इशोरन्स ची पॉलिसी घेतली होती, त्याचा रिस्क कवर अंतर्गत त्यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला माणुसकीचा आणि मानवतेचा स्पर्श असलेले एसबीआय शाखा पूर्णेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य भावनेने तत्परतेने ही मदत त्यांना मिळवून दिली .
या त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम बँकेचे कर्मचारी शेख फिरोज ,शेखहमीद, गजानन महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले मुख्य व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे यांच्या कल्पक अभिनव व लोकाभिमुख तत्पर बँकिंग सेवेमुळे विविध कल्याणकारी योजना जन माणसांमध्ये पोहोचत आहेत त्यांच्या या तत्पर सेवेमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.......
0 टिप्पण्या