🌟मातंग समाज एकनिष्ठ व खंबीरपणे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठीशी - गणपत भिसे
परभणी :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याशी आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी पालम येथील एम.के.फंक्शन हॉल येथे सामाजिक न्याय परिषदेस उपस्थित राहून संवाद साधला व तसेच मातंग समाजाच्या उन्नतीसाठी महायुती सरकारने घेतलेले सर्व निर्णय व धोरणांचा आढावा घेतला या प्रसंगी महायुती सरकारची व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची कामगिरी पाहाता मातंग समाज एकनिष्ठपणे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास गणपत भिसे यांनी व्यक्त केला.
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा ऊहापोह करण्यात आला. यावेळी जयंती निमित्त लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी रासपाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. व तसेच सामाजिक संघटन असल्यास कोणतीही गोष्ट अवघड नाही. यासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार उपस्थित समाज बांधवांनी केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष मित्र मंडळासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या