🌟या सभेस नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार राजेश विटेकर यांनी केले आहे🌟
परभणी (दि.१२ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता वालीबाचा मळा (राघवेंद्र इस्टेट) या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
या सभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या नेतेमंडळींसह पदाधिकार्यांनी भक्कम असे नियोजन करीत जोरदार शक्तीप्रदर्शन करावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. मानवत, पाथरी या भागात खेड्यापाड्यापर्यंत दौरेही सुरु झाले आहेत. या सभेस नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उमेदवार राजेश विटेकर यांनी केले आहे......
0 टिप्पण्या