🌟भविष्यात विविध शासकीय/ निमशासकीय विभागाकडून १० लक्षापर्यंतची कामे कौशल्य विकास विभागाकडे प्राप्त होतील🌟
परभणी (दि.२६ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार सेवा सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार तीन लाख रुपयांपर्यंतची कामे देण्यात येत होती. सदर शासन निर्णयामध्ये वित्तीय मर्यादेत सुधारणा करून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने शासन निर्णय दि.२८ ऑगस्ट २०२४ अन्वये कामाची रक्कम १० लाख रुपयांपर्यंत केली आहे. भविष्यात जिल्ह्यातील विविध शासकीय/ निमशासकीय विभागाकडून १० लक्षापर्यंतची कामे जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे प्राप्त होतील. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यरत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल २०२३-२४, संस्थेतील सर्व सभासदांचे चालू नाव नोंदणी प्रमाणपत्र सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांत संस्थेची काम करण्याची तयारी असल्यास संस्थेचे इच्छापत्र, मागील वर्षाचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे सर्व कागदपत्रे इत्यादी बाबी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, नारायण चाळ, स्टेडीअम जवळ परभणी येथे ०५ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत दाखल कराव्यात असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे......
0 टिप्पण्या