🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे विशाल कदम आघाडीवर.....!


🌟महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांना ०३ हजार ९८७ मते मिळाली🌟

परभणी गंगाखेड (दि.२३ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम हे तीसर्‍या फेरीअखेर ०३ हजार ८३२ मतांनी आघाडीवर होते.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास टपाली मतांच्या मतमोजणीस प्रारंभ झाला त्यातसुध्दा कदम यांनी आघाडी मारली. पाठोपाठ पहिल्या फेरीतील मतांची मोजणी सुरु झाली. त्यात आघाडीचे कदम यांना ०५ हजार २६४,महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांना ०३ हजार ९८७ मते मिळाली. त्यात पहिल्या फेरीतून कदम यांनी ०१ हजार ७७७ मतांची आघाडी घेतली. तीसर्‍याफेरी अखेरी कदम हे ०३ हजार ८३२ मतांनी आघाडीवर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या