🌟शहरातील डॉ.आंबेडकर नगर कमान येथून उद्या रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता पदयात्रेला सुरुवात🌟
पुर्णा (दि.१६ नोव्हेंबर २०२४) - गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तरुण तडफदार लोकहीतवादी उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ उद्या रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता पुर्णा शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या भव्य जनसंपर्क पदयात्रेची सुरुवात शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर कमान येथून होणार आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम हे भव्य जनसंपर्क पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी पुर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर या महापुरुषांना अभिवादन करुन भव्य जनसंपर्क पदयात्रेला डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरुवात करणार असून सदरील भव्य जनसंपर्क पदयात्रा यानंतर सिध्दार्थ नगर, अमोल कॉर्नर,हरिनगर,पंचशील नगर,विजय नगर,भिमनगर,कुंभार गल्ली, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर,सराफा बाजार, शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा बसवेश्वर चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,जामा मस्जिद,जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर या मार्गावरील थोरा मोठ्यांसह मतदार बांधव माता-भगिनींचे आशिर्वाद घेत निघालेल्या या भव्य जनसंपर्क पदयात्रेची सांगता जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर परिसरात होणार आहे.
या भव्य जनसंपर्क पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह सर्वधर्मीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे........
0 टिप्पण्या