🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारणार - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
पुर्णा (दि.१८ नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ काल रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी शहरातील झिरो टी कॉर्नर येथून भव्य जनसंपर्क रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या जनसंपर्क रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सदरील रॅलीचे रुपांतर नंतर शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सभेत करण्यात आले या सभेत बोलतांना महायुती पुरस्कृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून पूर्णा तालुक्यात विकास कामाची उदासीनता आहे पुर्णेत मोठा घोळ आहे माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत.पुर्णा शहरासह तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी मोठा प्रकल्प उभारणार असल्याचे आश्वासन देखील यावेळी आमदार गुट्टे यांनी दिले औद्योगिक वसाहतीची अनेक वर्षाची मागणी आहे या मागणीसह या भागात मोठा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादनही यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी परभणी जिल्ह्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर कडाडून टीका केली ते म्हणाले खासदार जाधव यांनी माझ्यावर साडेचार हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला असून खासदार जाधव यांनी केवळ पाचशें कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत मी स्वतः निवडणुकीतून माघार घेईल नसता तुम्ही पुरावे देऊ शकले तर तुम्ही निवडणूकीतून माघार घ्यावी यावेळी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना उद्देशून ते खासदार जाधव यांच्या विषयी म्हणाले की विशालभाऊ तुमच्या नेत्याचे काही खरे नाही ते केव्हा पलटी मारतील.... केव्हा चादर पांघरून झोपतील.... केव्हा बिमार पडतील अन् केव्हा जिंतूरला जातील....केव्हा एमरजन्सी आहे म्हणतील त्यांचे काही सांगता येत नाही आणि तुम्ही इकडं निवडणुकीत पुन्हा पडाल अशी खरपूस टिका देखील त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ काल रविवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली शहरातील झिरो टि पॉइंट येथून या रॅलीस सुरूवात झाली होती या भव्य जनसंपर्क रॅलीत असंख्य माता-भगिनींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित या भव्य जनसंपर्क रॅलीत स्वतः उमेदवार आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, मा.नगरसेवक नितीन उर्फ बंटी कदम,शिवशासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोलव,गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम,भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कापसे,शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ॲड.विशाल किरडे,संतोष सातपुते,आदींसह महायुती व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या भव्य जनसंपर्क रॅलीचे सभेत रुपांतर करण्यात आले यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन सेनेचे विजय वाकोडे,संदीप माटेगावकर,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,धम्मा जोंधळे,मोकींद भोळे,मधुकर गायकवाड,हनुमंत अग्रवाल,आमिन भाई,मास्टर अनिल कांबळे आदींची उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या