🌟याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟
*************************************
नानक- साई फाऊंडेशन,हुजूर साहिब नांदेड संस्थेकडून दरवर्षी पंजाबमध्ये जाणाऱ्या संत नामदेव घुमान यात्रेकरू व फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री.पंढरीनाथ बोकारे यांचे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून अकोला रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या या सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या संतदर्शनाच्या धार्मिक पर्यटन उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्यात.ही यात्रा पंजाब मध्ये घुमानसह पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेशातील धार्मिक सांस्कृतिक ठीकाणांना भेटी देऊन दि.२५ नोव्हेंबर रोजी अकोला मार्गे नांदेडला परत जाणार आहे.
याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेसह राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,संघटनेचे पदाधिकारी अंबादास तल्हार, के.व्ही.देशमुख सर, पंजाबराव वर,संजयबाप्पू देशमुख, कंझारेकर,सागर लोडम,मनोहर मोहोड उपस्थित होते.......
0 टिप्पण्या