🌟रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी अँपवर नोंदणी करावी - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे


🌟या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अँपव्दारे पिकांची नोंद करण्यात येत आहे🌟

परभणी :- संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अँपद्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबरपासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अँपव्दारे पिकांची नोंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे रब्बी हंगाम २०२४ करिता कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ आणि सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ करण्याची मुदत देण्यात आली आहे पात्र शेतक-यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यास्तव, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी विहीत कालावधीत मोबाईल अँपमध्ये पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे.....

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या