🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या २३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ...!


🌟साखर कारखाण्याच्या २३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि.१३ नोव्हेंबर रोजी एम.टी.नाना देशमुख यांच्या शुभहस्ते होणार🌟

प्रतिनिधी

परभणी/पाथरी :- परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स प्रा.लि. या साखर कारखाण्याच्या २३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सकाळी ११ वाजता एम टी नाना देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख यांनी दिली.

या वेळी प्रमुख उपस्थितीत एच टी देशमुख, जे टी भाऊ देशमुख,या साखर कारखाण्याचे चेअरमन माजलगावचे माजी आ. आर टी देशमुख जिजा यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमा साठी ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,तोडणी वाहतुक ठेकेदार कर्मचारी यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख,संचालक राहुल आर देशमुख,डॉ अभिजित आर देशमुख,संचालक,प्रवर्तक मंडळ,अधिकारी,कर्मचारी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या