🌟तरुण तडफदार उमेदवार विशाल कदम यांना मतदार जनतेतून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रस्थापितांचे दणाणले धाबे🌟
पुर्णा (दि.१४ नोव्हेंबर २०२४) :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या धनाढ्य प्रस्थापित उमेदवारांसमोर महाविकास आघाडीचे अधिकृत तरुण तडफदार उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून तगडे आव्हान उभे केले असून सर्वसामान्य मतदार जनतेतून त्यांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकतांना दिसत असल्याचे चित्र संपूर्ण गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.
महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांची स्वच्छ प्रतिमा प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावासह आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या बळावर आपले वर्चस्व निर्माण केले त्यामुळे विशाल कदम यांच्या मागे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तरुणवर्गासह सर्वधर्मीय मतदार त्यांच्या कार्यशैलीवर प्रभावित झाले असून आपल्या पद प्रतिष्ठेचा उपयोग विशाल कदम हे सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी करीत असतात प्रत्येकाच्या सुख दुःखात धाऊन जाण्याची त्यांची सवय असून मागील दहा वर्षांपासून सातत्याने विशाल कदम हे गोरगरीब निराधार मुलांच्या पालन पोषणाचा खर्च स्वतः उचलत दरवर्षी दसरा/दिवाळी सन उत्सवात गुणवंत विद्यार्थ्यांना सुटबुट दप्तरांसह शालेय साहित्य तसेच गरजू कुटुंबातील मुलींच्या विवाह सोहळ्यात मुलीला कन्यादान म्हणुन संसारोपयोगी साहित्याची भरघोस मदत,अडल्या नडल्या लोकांना जी पाहिजे ती योग्य पद्धतीने मदत करीत असतात.
गंगाखेड विधानसभेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापित धनदांडग्यांपुढे प्रखर आवाहन उभे करीत द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या या विशाल कदम यांनी पराभवानंतर खचून न जाता या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर ते मतदानरुपी आशिर्वाद मिळवण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या विजयासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय जाधव यांनी सुद्धा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गावोगावी झंझावाती प्रचार दौरे सुरू केले आहेत.
महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद त्यांच्या ऐतिहासिक विजयाची नांदी असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जागरूक मतदार जनता सर्वगुण संपन्न उमेदवार विशाल कदम या तरुण तडफदार भूमिपुत्राला निश्चितच निवडून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे......
0 टिप्पण्या