🌟उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला,आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यातील हारुन खान यांच्या उमेदवारीवरुन राज ठाकरेंची टीका🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 उद्धव ठाकरेंच्या बॅग अन् हेलिकॉप्टरची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी, वणीनंतर लातूरच्या औसामध्ये आयोगाचं पथक तपासणीसाठी हजर, दरवेळेला मीच पहिलं गिऱ्हाईक म्हणत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट ; सत्ता त्यांच्या हातात, विरोधकांना त्रास द्यायचं ठरलेलं असावं, सहन करावं लागेल मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक, शरद पवारांची प्रतिक्रिया ; यंत्रणा कायद्यानं समान वागली, घाबरायचे कारण काय? भाजपच्या आशिष शेलार यांचा कविता पोस्ट करत सवाल
💫 उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला,आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यातील हारुन खान यांच्या उमेदवारीवरुन राज ठाकरेंची घणाघाती टीका ; राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांना एकाचवेळी महाराष्ट्र-गुजरातचं नेतृत्त्व करायचंय, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही -- संजय राऊत
💫 नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपूरच्या चिमूर येथील भाषणात नरेंद्र मोदींचा काँग्रेस,मविआवर हल्लाबोल ; लोकसभेला 400 जागा कशासाठी मागितलेल्या, नरेंद्र मोदींचा वेगळाच डाव होता, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्यासाठी ठिकठिकाणी 400 जागांची मागणी, शरद पवारांचा हल्लाबोल
💫 एकनाथ शिंदेंकडील एक मंत्री 8 आमदारांसोबत परत येणार होता, विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना फोन आलेला,आदित्य ठाकरेंच्या दाव्यानं खळबळ ; जी लोकं तुमच्या संपर्कात आहेत, त्यांना बोलावून घ्या, माध्यमांसमोर ते दाखवा, श्रीकांत शिंदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान
💫 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी हालचाली, सॅमसन पाथरे या व्यक्तीची ईडीला प्रतिवादी करत मुंबई हायकोर्टात याचिका ; नवाब मलिक यांच्या प्रकरणात सर्व माहिती घेऊन बोलणार, अजित पवार यांची श्रीरामपूरमध्ये पहिली प्रतिक्रिया
💫 पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला ; पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 10 नगरसेवकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, अमोल कोल्हेंचा काँग्रेस अन् भाजपला दणका
💫 रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? भाजप आमदार भीमराव केराम यांचं पंकजा मुंडे मंचावर असताना बेताल वक्तव्य
💫 हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा,अरविंद केजरीवालांच्या आपचे खासदार संजय सिंह यांची काँग्रेस अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोठी मागणी
💫 अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरे अन् शेखर गोरे यांचं मनोमिलन,भावाच्या विजयासाठी शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात ; मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी, तपास अहवाल सादर करण्याचे आदेश
💫 पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलला नकार दिल्यास स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता, आयसीसी समोर पेच सोडवण्याचं आव्हान, ; स्पर्धा देशाबाहेर नेल्यास भारताविरुद्ध कधीच खेळणार नाही, पीसीबीची नवी भूमिका
💫 बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता,मुंबई पोलिसांना शर्ट बदलून गुंगारा दिला,पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या