🌟नांदेड येथील श्री दशमेश ज्योत शाळेत महाराजा रणजीतसिंघजी यांची जयंती उत्साहात साजरी.....!


🌟महाराजा रणजीतसिंघजी न्यायप्रिय महाराजा : भाई गुरमीत सिंघजी🌟 


नांदेड (दि.29 नोव्हेंबर 2024) :- जवळपास चाळीस वर्षें एकछत्र साम्राज्य करीत परकीय आक्रमणाचा सामना करणारे शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंघजी हे प्रजेसाठी न्यायप्रिय चक्रवर्ती महाराजा होते असे प्रतिपादन गुरुद्वारा तख्त सचखंड हजुर साहिबचे मीत ग्रंथी सिंघ भाई गुरमीत सिंघजी यांनी गुरुवारी दशमेशज्योत इंग्लिश मिडियम शाळा व निष्काम सेवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुद्वाराचे मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकमलसिंघ गाडीवाले, इंदरजीतसिंघ गडगज, दिलीपसिंघ रागी, जगजीवनसिंघ रिसालदार, हरबंससिंघ वासरीकर, खेमसिंघ पुजारी, प्राचार्य गुरबचनसिंघ सिलेदार, हुकूमसिंघ कराबीन, रविंदरसिंघ मोदी, कमलजीतकौर गाडीवाले, गुरप्रसादकौर, स. मानसिंघ, स. हरजीतसिंघ यांची उपस्थिती होती. 


महाराजा रणजीतसिंघजी यांची जयंती साजरी करण्यामागे देशाला, समाजाला आणी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी असा उद्देश स्पष्ट करतांना भाई गुरमीतसिंघजी पुढे म्हणाले, वयाच्या दहा बाराव्या वर्षी राजा म्हणून पद संभाळणारे रणजीतसिंघ यांनी पुढे चक्रवर्ती (महाराजा) म्हणून ओळख कायम केली. त्यांनी बारा सैन्य समुहात एकता घडवून आणली. प्रजेसाठी निष्पक्ष सेवा केली संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराजा रणजीत सिंघजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ऐतहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. राजकमलसिंघ गाडीवाले यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले आणी मागणी केली की महाराजा रणजीतसिंघजी यांच्या स्मरणार्थ नांदेड ते लाहौर पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात यावे. तसेच महाराजा रणजीतसिंघजी यांच्या नावाने हॉल किंवा इमारत तयार करावी. कार्यक्रमात निबंध स्पर्धेच्या विजेयतांना पारितोषिक वितरित करण्यात आली. कार्यक्रमानंतर लंगरप्रसाद कार्यक्रम झाले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या