🌟परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता बाळगा.....!


🌟निवडणूक निरीक्षकांनी केल्या सक्त सूचना : निर्भय वातावरणाची दक्षता घ्यावयाचा सल्ला🌟

परभणी :- परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात  यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी,पोलीस यंत्रणा व नोडल अधिकर्‍यांनी सर्वतोपरी दक्षता बाळगावी अशी सक्त सूचना निवडणूक निरीक्षकांनी केली आहे.

                  परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात काल गुरुवार दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता निवडणूक निरीक्षक (सामान्य)  संचिता बिष्णोई,  निवडणूक निरीक्षक (पोलीस)  राजेश दुग्गल, निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत मतदान व मतमोजणी  पूर्वतयारीचा एका बैठकीद्वारे सविस्तर  आढावा घेण्यात आला.

                 यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे व नोडल अधिकारी उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे गंगाखेड, पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार बैठकीत सहभागी झाले होते.

                  मतदानाला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे सर्व यंत्रणांनी अधिक सजगतेने सोपविलेली कामे करावीत. मतदान केंद्र आवश्यक सुविधांनी सुसज्ज ठेवावीत. याठिकाणी स्वच्छता राखावी. मतदान केंद्र व परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करावे. वेबकास्टींग, पोलीस बंदोबस्त, स्ट्राँग रुम, मतदान यंत्रांची सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याबरोबरचे सी-व्हीजील पवरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे, अवैध बाबींवर कारवाई करणे, आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता व  संचिता बिष्णोई यांनी दिले.

               निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल  यांनी एफएसटी आणि एसएसटी  पथकांनी अधिक सक्रिय होण्याबाबत सूचित केले. या पथकांनी अचानक धाडसत्र मोहिम राबवावी. कुठे अवैध बाबी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. मतदान केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदाबस्त ठेवावा. संवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनात अधिक दक्षता घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात. शहराच्या मुख्य ठिकाणी पथसंचलन करावे. रेल्वे, बसस्थानक येथेही तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी काळजीपूर्वक नोंदवाव्यात. प्रत्येक बाबींच्या खर्चाचा तपशील अद्यावत ठेवावा, अशा सूचना केल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या