🌟भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ.आर.एस.परोडा यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
🌟समृद्ध शेती बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे - डॉ.आर.एस.परोडा
परभणी (दि.12 नोव्हेंबर 2024) : शेती उत्पादन वाढले आहे, परंतु किडींचा प्रादुर्भाव. नैसर्गिक संकटे यामुळे शेती उत्पादनाची आणि अन्नधान्याच्या नासाडी मध्ये वाढ झालेली आहे. याबरोबरच जमिनीची प्रतही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. यासारख्या समस्यासह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करणे तसेच शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे या महत्त्वाच्या समस्या आहेत. शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. भारत देश शेतीप्रधान आहे, यास शेतकरी प्रधान देश करणे गरजेचे आहे. समृद्ध शेती बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे मत भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ. आर.एस.परोडा यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नेक्स्ट-जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सची 58 वे वार्षिक अधिवेशन आणि कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कुलुगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि तर मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ. आर. एस. परोडा, विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक (ऑनलाईन) आणि कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे (भाप्रसे ) हे होते. तसेच पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या शेती साहित्य विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत सिक्का, टॅफेचे समूहाचे टी. आर. केशवन, महिको समूहाचे राजेंद्र बारवाले, आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर लि. चे उपाध्यक्ष कुमार बिमल, भारतीय कृषि अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. गजेंद्र सिंह, डॉ. नवाब अली आणि डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्यासह वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, वनामकृविचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. ढवण यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अभियंता संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा, संघटनेचे मुख्य सचिव डॉ. पी.के. साहू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांतराव देशमुख, सुमित्रा शेंद्रे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पद्मभुषण डॉ. आर. एस. परोडा म्हणाले की, शेती व्यवसायात युवकांचा सहभाग कमी असून तो वाढवणे आवश्यक आहे. युवकांनी पांढरपेशी नोकरी मिळवण्यापेक्षा शेती व्यवसायासह उद्योजक व्हावे. यासाठी युवकांमध्ये कौशल्यवृद्धी करावी लागेल यातूनच उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि कृषी अभियंते निर्माण होतील. शेती व्यवसायासाठी शाश्वत संसाधनांचीही आवश्यकता आहे. तसेच जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून संवर्धित आणि संरक्षित शेती करण्यास चालना देणे आवश्यक आहे. या सर्व कार्यात कृषी अभियंत्याची महत्त्वाची भूमिका असून विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी कृषी अभियांत्रिकीमधून तंत्रज्ञानाचा आणि यांत्रिकीकरणाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व विभागांनी एकत्रतीतरित्या कार्य करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये भारतीय कृषि अभियंता संघटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत देश जगात सर्वात अधिक ट्रॅक्टर उत्पादन करीत असून जगातील अर्धा वाटा भारताचा आहे. याबरोबरच कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातून खुरपी-विळ्यापासून ते आधुनिक काढणी - मळणी यंत्रे याबरोबरच अन्नधान्य, सोयाबीन, फळ, भाजीपाला पिके यांच्या प्रक्रिया उद्योगासाठी अतिशय उपयुक्त आणि हाताळणीस सुलभ असणारे मशनरी आणि अवजारे विकसित केलेले आहेत असे नमूद करून त्यांनी ग्रामीण पातळीवर भाडेतत्त्वावर अवजारे देणारी बँक निर्माण करणे, खाजगी क्षेत्रातून विस्तार कार्यास चालना देणे, हरितगृहे विकसित करणे, सौरउर्जाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. या सर्व क्षेत्रासाठी कृषी अभियांत्रिकी क्षेत्राचा सर्वस्तरावरून विकास होणे गरजेचे असून याद्वारे आधुनिक अवजारे आणि यांत्रिकीकरणास चालना मिळेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात परिसंवादाची स्मरणिका, विद्यापीठाचे न्यूज लेटर, डिरेक्टरी ऑफ एग्रीकल्चर इंजिनियर्स इन इंडिया, संघटनेची 2025 ची दिनदर्शिका आणि संघटनेच्या जर्नलच्या दोन मासिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच तीन दिवशीय परिसंवादामध्ये अतिशय सुशोभनीय आणि तंत्रज्ञानाने भरगच्च अशा कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत भारतीय कृषि अभियंता संघटनेद्वारा डॉ. सत्यानंद स्वेन आणि डॉ प्रीतम चंद्रा यांना स्वर्ण पदकाने तसेच संघटनेतील विविध शास्त्रज्ञांचे त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संयोजन सचिव डॉ. हरीश आवारी, सह संयोजक डॉ. आर. टी. रामटेके आणि डॉ. आर जी. भाग्यवंत, संयोजन सह सचिव डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. व्ही. के. इंगळे आणि डॉ. डी.डी. टेकाळे यांनी केले आहे. कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, अधिकारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. हरीश आवारी यांनी मानले......
0 टिप्पण्या