🌟महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पर्याय खुले ठेवत सत्तेसोबत जाण्याचा मार्ग ॲड.आंबेडकर यांनी केला स्पष्ट🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आमचा पाठिंबा राहिल अशी स्पष्ट भूमीका आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन नेते ॲड.प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी अगोदर आलेल्या एक्झीट पोल मध्ये राज्यात त्रिशंकु सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेत अपक्षांसह वंचित बहुजन आघाडीची देखील महत्वाची भुमिका राहणार आहे राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये आज सकाळपासून सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचालींना सुरुवात झाल्याचे दिसत आहे महायुती व महाविकास आघाडीकडून इतर पक्षांच्या विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांसाठी पक्षांसह अपक्ष आमदारांची देखील मनधरणी सुरु झाली आहे.
राज्यात तिसऱ्या आघाडीची मजबूत मोट बांधणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती शिवाय ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्यासहीत संभाजी राजे छत्रपती आणि इतर नेत्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी उभारुन निवडणूक लढली अनेक ठिकाणी ॲड.प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिले. त्यातच आता ॲड. शप्रकाश आंबेडकर यांनी आपली आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंत करणार आहोत असे ॲड.आंबेडकर यांनी एक्स समाज माध्यमावर ट्विट करुन स्पष्ट केले आहे आपल्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पर्याय खुले ठेवत सत्तेसोबत जाण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे....
0 टिप्पण्या