🌟धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात ; बच्चू कडूंचा प्रहार🌟
✍️ मोहन चौकेकर
लोकसभा निवडणुकीतील छत्रपती संभाजीनगरमधील पराभव जिव्हारी लागला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भावनिक बंध सांगितला, ; महाराष्ट्रद्रोह्यांना साथ देणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, तर नात्यांची गल्लत नको, माझं नातं महाराष्ट्राशी, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र
💫 धर्माचा वापर करुन शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल ; महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा लढा, संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर
💫 एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य ; मी पेताडी, गंजेडी असतो तर ठीक, नातवाचा एवढा पुळका का आलाय? मी काकींना विचारणार, बारामतीमध्ये अजितदादा पवारांचे वक्तव्य
💫 प्रतिभा पवारांसंबधी अजितदादा पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर, त्यांनी या आधीही प्रचार केल्याचं स्पष्टीकरण ; अजित पवार यांना पाडण्याचं आवाहन करणार का, शरद पवार म्हणाले, अजून बारामतीत गेलो नाही ; अजितदादांच्या 'साहेबांच्यानंतर मीच वाली' वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर म्हणाले, लोकांनी म्हटलं पाहिजे, तुम्ही म्हणून काय उपयोग
💫 मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, छगन भुजबळांचं नाव न घेता मनोज जरांगेंचं येवल्यात जाऊन आवाहन
💫 कैलास पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती, पण ते गेले नाहीत, धाराशीवच्या सभेत खासदार ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट
💫 बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती प्रहार ; भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; पैलवान बजरंग पुनियांचा कोल्हापुरातून प्रहार
💫 धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
💫 निवडणुकीचा प्रचार 'सोयाबीन' या चार अक्षराभोवती, मराठवाडा-विदर्भातील 70 मतदारसंघात सोयाबीनच्या दराचा फटका बसण्याची शक्यता
💫 उत्तर प्रदेशात झाशीमधील सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या