🌟असे आवाहन सामाजीक कार्यकर्त्या प्रज्ञा भगत यांनी केले आहे🌟
वाशिम : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकरिता बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदाना मध्ये तरुण पिढीने १००% मतदान करून लोकशाही बळकट करण्यात आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा भगत यांनी वाशिम जिल्ह्यातील समस्त तरुणाईला केले आहे.
मागील झालेल्या निवडणुकांमध्ये मध्ये तरुणांची मतदानाची टक्केवारी ही कमी असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या आकडेवारी वरून बघायला मिळते. या मागचे प्रमुख कारण म्हणजे तरुणवर्गाची मतदान हक्क बजाविन्या बाबतची उदासीनता अथवा कंटाळा असे आहे.
आजकालच्या तरुणवर्गामध्ये माझ्या एकट्याच्या मतदानामुळे काय फरक पडेल, मतदानाची सुट्टी कुठे फिरण्यासाठी वापरूया अशी मानसिकता सरास आढळून येते परंतु थेंबे-थेंबे तळे साचे व मतदानाची सुट्टी ही फिरण्याचासाठी नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी साठी आहे हे भान तरुणांना असायला पाहिजे.
मतदान करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता, उमेदवाराची जात-धर्म-पंथ याचा विचार न करता ज्या उमेदवाराला तरुणवर्गाच्या समस्या जसेकी शिक्षण, रोजगार, इत्यादी ची जान असेल अश्याच उमेदवाराला मतदान करावे व लोकशाहीच्या ह्या उत्सवात सहभागी होऊन तरुणांना १०० % मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन सामाजीक कार्यकर्त्या प्रज्ञा भगत यांनी केले आहे.......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या