🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासप उमेदवार डॉ रत्नाकर गुट्टे विरोधात बनावट व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल गुन्हा दाखल...!


🌟गंगाखेड पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल🌟 

परभणी (दि.१२ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या बनावट मुलाचा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील एक बनावट व्हिडीओ सोशल मिडीयातून व्हायरल केल्याबद्दल गंगाखेड पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             या मतदारसंघात प्रचारयुध्द चांगले पेटले असतांना सोशल मिडीयातून धनराज विक्रम गुट्टे नामक व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात धनराज गुट्टे ही व्यक्ती गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव असल्याचे दर्शवून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तो गरळ ओकत असल्याचे व बदनामी करत असल्याचे दाखविले जात आहे. लागोपाठ दोन व्हिडीओ याच आशयाचे व्हायरल झाल्यानंतर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी या संदर्भात गंगाखेड पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी हनुमंत लटपटे यांनी गंगाखेड पोलिस स्टेशन गाठून व्हायरल केलेल्या त्या व्हिडीओबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

               दरम्यान,या प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतल्याची माहिती देखील हाती आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या