🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघात समाजमनं दुभंगणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारांनी निवडणूक प्रचार करायला हवा....!

 


🌟सोशल मिडियावर उमेदवारांच्या तथाकथित समर्थकांकडून समाजात दुफळी निर्माण करणारा आत्मघातकी अपप्रचार ?🌟 

परभणी (वृत्त विशेष :- चौधरी दिनेश ) :- जगात जर्मनी भारतात परभणी ? परभणीत एकमेव पुर्णा अन् पुर्णेच्या हक्क अधिकाराच गिळायला भ्रष्ट बेईमान शाहांना काही सुध्दा पुरणा ? शेती व्यवसाय गिळले....उद्योग व्यवसाय गिळले.....पुर्णा जंक्शनच्या हक्काची अनेक महत्त्वाची कार्यालय गिळली....पुर्णा जंक्शन स्थानकाला वगळून चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गाला मुकसंमती देऊन पुर्णेचे वैभव गिळले....पुर्णा-गोदावरी नदीपात्र हस्तक माफिया तस्करांकडून रात्रंदिवस खरडून शासकीय गौण खनिज वाळूसाठे गिळले....पुर्णा तालुक्यात राजकीय मतभेदांना वैयक्तीक शत्रूत्वाचे स्वरूप देऊन षडयंत्रकारी कुंभाड रचत असंख्य तरुणांचे आयुष्य उध्वस्त करीत त्यांचे भविष्य गिळले....पुर्णा शहरासह तालुक्याच्या विकासाला कायमची खिळ लावून व्यापाऱ्यांचे व्यवसाय धंदे गिळत अनैतिक/अवैध व्यवसायांचे डोंगर उभारुन शहरासह तालुक्यातील शांतता सुव्यवस्था एकात्मता गिळली....आता अजून यापुढे स्वतःच्या संधीसाधू राजकीय स्वार्थासह सत्तेच्या हव्यासापोटी प्रत्येक समाजा समाजात जातीयवादाचे विषारी बिज पेरून संपूर्ण तालुक्याची राखरांगोळी करणार आहात काय ? असा हृदयविदारक प्रश्न गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य मतदार जनतेत उपस्थित होत आहे.


परभणी जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी पुर्वी राखीव असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात समावेश होण्यापूर्वी पुर्णा तालुका हा परभणी विधानसभा मतदारसंघाचा विजयी उमेदवाराला बोनस मतदान देणारा महत्त्वाचा भाग होता सन २००८ यावर्षी परभणी विधानसभा मतदारसंघातील पुर्णा तालुक्याचा गंगाखेड विधानसभा मतदारसंघात समावेश झाल्यानंतर या तालुक्याचा सर्वार्थाने सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात होती परंतु या तालुक्यातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल की परभणीचे मांडलीकत्व संपल्यानंतर पुन्हा या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर मुंबई/गंगाखेडचे मांडलीकत्व स्विकारण्याची वेळ आली त्यामुळे या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गंगाखेड/पालम या तालुक्यांच्या तुलनेत वेळोवेळी पुर्णा तालुक्याशी दुजाभावच केल्याची भावना या पुर्णा तालुक्यातील जनतेत निर्माण झाली असून यावेळी तरी पुर्णा तालुक्यासह पालम गंगाखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुर्णा तालुक्यातील उमेदवाराला निवडून येण्याची संधी एकवेळ नक्कीच द्यायला हवी असा दृढ निर्धार सर्वसामान्य मतदार जनतेतून व्यक्त केला जात असला तरी धनशक्ती पुन्हा एकदा जनशक्तीवर वरचढ होते की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आता १२ उमेदवार उतरले असून यात शिवसेना (उबाठा),राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीकडून तरुण तडफदार नेतृत्व विशाल विजयकुमार कदम,महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे,वंचित बहुजन आघाडीकडून तीन वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सिताराम घनदाट,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रुपेश देशमुख,जनहित लोकशाही पार्टीकडून विठ्ठल जिवनाजी रबदडे आदींसह एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून या बारा उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे अधिकृत तुल्यबळ तरुण तडफदार उमेदवार विशाल कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश देशमुख हे दोन उमेदवार पुर्णा तालुक्यातील आहेत.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा दृढ निर्धार केलेल्या काही उमेदवारांनी धनशक्ती/जातभक्तीसह खोट्या अफवा पसरवण्याची अनोखी युक्ती देखील अंगिकारल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे वातावरण कमालीचे तापू लागले असून काही उमेदवारांच्या विषारी प्रचारयंत्रणेमुळे आता समाजा समाजात दुफळी निर्माण होत असतांना देखील पाहावयास मिळत असून या विषारी अपप्रचाराचे लोण आता शहरीभागातून ग्रामीण भागात देखील वेगाने पसरतांना दिसत असून मागील निवडणुकांमध्ये प्रखर हिंदुत्ववादी आघाडी विरुद्ध धर्मनिरपेक्ष आघाडी तर या दोन आघाड्यांच्या विरोधात समाजवाद्यांची पर्यायी तिसरी आघाडी असे निवडणूकांचे एकंदर स्वरूप पाहायला मिळत होते परंतु या विधानसभा निवडणुकीत मात्र गलिच्छ राजकारण्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असे समिकरण वापरण्यास सुरुवात केल्याने समाजमन दुभंगतांना पाहावयास मिळत असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये एकमेकांशी अगदी मिळूनमिसळून राहणारा प्रत्येक समाज आज जातीयवादी राजकीय विषारी विळख्यात सापडल्याचे भयावह चित्र पाहावयास मिळत असून या मतदारसंघात उमेदवार समर्थक विरोधकांकडून सोशल नेटवर्किंग साइट वाट्सॲपसह फेसबुक इन्स्टाग्राम आदी प्रसार माध्यमांवर समाजात समाजात द्वेष निर्माण करणारा निवडणूक अपप्रचार आत्मघातकी ठरणार तर नाही ना ? या प्रश्नावर कठोर आत्मचिंतन करण्याची वेळ आता प्रत्येक उमेदवारावर आलेली पाहावयास मिळत आहे......



  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या