🌟अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार चंद्रकांत साळुंके कुटुंबीयांना आर्थिक मदत.....!


🌟परिषदेच्या वतीने आर्थिक मदतीचा साळुंके कुटुंबीयांना 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला🌟

बीड येथील पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे दुचाकी अपघातामध्ये निधन झाले होते. त्यांचे मूळ गाव बीड तालुक्यातील नागापूर हे आहे. मंगळवारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी  पत्रकार साळुंके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिषदेच्या वतीने आर्थिक मदतीचा त्यांना 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

पत्रकार चंद्रकांत उद्धवराव साळुंके (वय 44) बीड शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून माध्यम क्षेत्रात कार्यरत होते. अत्यंत मनमिळाव स्वभाव म्हणून त्यांची ओळख होती. बीड शहरामधून कामकाज आटोपून गावाकडे परतत असताना दुचाकी अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी नागापूर येथे पत्रकार साळुंके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, परिषदेचे विभागीय संघटक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत, जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, तालुका कोषाध्यक्ष प्रशांत लहुरीकर, संपादक सहस आदोडे, संपादक सलामत पठाण, यांच्यासह ग्रामस्थ दिलावर पठाण, विठ्ठल साळुंके, राहुल साळुंके आदी उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या