🌟पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वृत्तपत्र वाचन कट्याचे थाटात उद्घाटन संपन्न.....!


🌟शहरातील योगेश वडापाव सेंटरचे मालक सोपान वेडे यांचा कौतुकास्पद उपक्रम : वृत्तपत्र वाचकांसाठी निर्माण केला वाचन कट्टा🌟 


पुर्णा (वृत्त विशेष) - पुर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात आज शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी येथील योगेश वडापाव सेंटरचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते सोपान वेडे यांच्या वतीने स्वखर्चातून वृत्तपत्र वाचकांसाठी मोफत वृत्तपत्र वाचन कट्याचे निर्माण करण्यात आले.

 या वृत्तपत्र वाचन कट्याचा उद्घाटन सोहळा आज शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइं नेते प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे माजी नगराध्यक्ष मोहम्मद हाजी साहाब कुरेशी,ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे गजानन हिवरे विनायक देसाई अमृत कऱ्हाळे अंनिस बाबूमिया यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला यावेळी महंमद शफी,मिलिंद सोनकांबळे,संजय शिंदे,बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे,अतूल गवळी,उमेश बाऱ्हाटे,प्रविण कनकुटे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक गोबाडे यांनी शुभेच्छा देतांना वृत्तपत्र वाचन कट्टा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असुन या उपक्रम सातत्याने सुरळीत सुरू ठेवावा असे म्हणाले यावेळी प्रकाश कांबळे यांनी वाचन संस्कृती माध्यमातून लोकांना शहाण करण्याचे कार्य करित आहेत वाचनाने जिवन समृद्ध होते असे म्हणाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा परभणी भुषण उत्तमभैया खंदारे यांनी वृत्तपत्र वाचन कट्टा उपक्रमाला चालना देणारे सामाजिक कार्यकर्ते सोपान वेडे यांचे कौतूक करून अभिनंदन केले यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृत कऱ्हाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचक मंडळीनी प्रयत्न केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या