🌟आम्हाला बहुमत मिळणार,आज संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार - नाना पटोले
💫 महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा उद्या निकाल, विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; खासदार नारायण राणेंचा खळबळजनक दावा ; एक्झिट पोलचा लोड घेऊ नका, महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास ; शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य
💫 आम्हाला बहुमत मिळणार,आज संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य ; पडद्यामागे गुप्त हालचाली सुरु, महाविकास आघाडीतील एक पक्ष फुटणार; राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा दावा
💫 राज्याच्या चाव्या शरद पवारांच्या हाती, मुख्यमंत्री ठरवायला आम्हाला दिल्लीवारी करावी लागणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य ;
💫 गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका ; अजित पवार जर बारामतीतून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल, अमोल मिटकरींचा आव्हाडांना टोला
💫 महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संपर्क सुरु, निकालाचे कल हातात आले की आम्ही निर्णय घेऊ, बच्चू कडू यांचं वक्तव्य ;
💫 अपक्ष उमेदवारांवर महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांचे लक्ष, माढ्याचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्यासह करमाळ्याचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना दोन्हीकडील नेत्यांचे फोन
💫 आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य ; वंचितचे 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करु; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला ; प्रकाश आंबेडकरांना एकही जागा मिळते का ते पाहू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका
💫 पुण्यात झळकले अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण ; निकालाआधीच माळशिरसचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकरांच्या विजयाचे लागले बॅनर, राज्यात सर्वाधिक मतांनी जानकर निवडून येणार, कार्यकर्त्यांना विश्वास
💫 महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले,प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा खळबळजनक दावा ; माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
💫 छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले
💫 गौतम अदानी यांच्यावर फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप केल्यानंतर एलआयसीचे 1200 कोटी रुपये बुडाले, शेअर मार्केटच्या लाल आगीत विमा कंपनी होरपळली ; शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ
💫 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांचाही भेदक मारा, पहिल्या दिवसअखेर 67 धावांत 7 फलंदाज माघारी, प्रथम फलंदाजी करताना भारताचाही पहिला डाव फसला, 150 धावांत गुंडाळलं ; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने केली मोठी चूक, पकडलेला झेल शेवटच्या क्षणी हातातून निसटला
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या