🌟मंगरुळपीर येथे दिपावली निमित्य मातृत्व हरवलेल्या कु.गुंजन आणी तृप्ती या दोन महालक्ष्मीचे पुजन करुन दिला मदतीचा हात...!


🌟 कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वस्तरातून होत आहे नाकौतुक🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर येथील कु.गुंजन आणी तृप्ती डाके या मातृत्व हरवलेल्या दोन चिमुकलीसमवेत फुलचंद भगत आणी रुपेश वाढणकर यांनी परिवारासह त्यांच्या घरी जावुन मुलींना नविन कपडे आणी फराळ देवुन फटाके फोडुन आनंदात दिवाळी साजरी केली.या सेवाभावी ऊपक्रमामुळे गरजु गरीबांनाही आनंदाचे क्षण जगण्यास मदत करता येते हे ऊत्तम ऊदाहरण देवुन सामाजिक कार्याचा परिचय दिला आहे त्यामुळे सर्वञ कौतुक होत आहे.

             मंगरुळपीर शहरातील अशोकनगर येथील डाके कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलीचे मातृत्व हरवले.त्या दोन मुलींचे वडील कोरोना काळात मरण पावले आईही नाही.म्हातारी आजी काबाडकष्ट करुन या दोन चिमुकल्या मुलीचा सांभाळ करुन ऊदरनिर्वाह करते.अशा हलाकीच्या परिस्थीतीत जीवन जगणार्‍या या दोन चिमुकल्या महालक्ष्मींना मदतीचा हात देवुन आणी त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करत आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते आणी पञकार असलेले फुलचंद भगत आणी त्यांचा परिवार आणी प्रतिष्ठीत व्यापारी व सामाजीक कार्यात सदैव तत्पर असलेल्या  रुपेश वाढणकर आणी त्यांच्या परिवाराने केला आहे.


भगत आणी वाढणकर परिवारातील सदस्य यांनी परिवारासह लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अशोकनगर येथील डाके कुटुंबाच्या घरी जावुन चिमुकल्या कु.गुंजन आणी कु.तृप्ती या मुलीचे पुजन करुन त्यांना नविन कपडे दिले.पेढा भरवुन फराळ दिला इतकेच नव्हे तर चिमुकल्या मुलांसमवेत फटाके फोडुन आपला आनंदही व्यक्त केला.या सेवाभावी ऊपक्रमामुळे एका गरजु व गरीब कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण करुन दिवाळी साजरी केल्यामुळे परिसरात कौतुक होत असुन इतरांनीही गरजु आणी गरीबांना मदत करुन सेवाभाव जोपासण्याचे आवाहन यावेळी भगत आणी वाढणकर परिवाराने केले आहे.या दिपोत्सव सणाच्या ऊपक्रमासाठी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत,प्रज्ञा भगत,कु.स्वरा भगत,रुपेश वाढणकर,आरुष वाढणकर,अर्चना वाढणकर आदींची ऊपस्थीती होती.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या