🌟उठ मतदार जागा हो....लोकशाहीचा धागा हो.....!


🌟'आपले मतदान आपला हक्क' आहे याची जाणीव ठेवून कुठल्याही भुलथापांना,कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करा🌟

तुम्हाला आपल्या मताधिकाराचा सद्विवेक बुध्दीने वापर करीत तुमच्या हक्क अधिकारासाठी राज्याच्या विधानसभेत आवाज उठवण्यासाठी लोकसेवक निवडून द्यायचा आहे की तुमच्याच मतांवर निवडून येऊन तुमचा मालक बनू पाहणारा लोकमालक ? या प्रश्नावर आत्मचिंतन करुन तुम्हाला तुमच्या मताधिकाराचा वापर करायचा आहे 

जागरूक मतदार माता-भिगिनी आणि मतदार बांधवानों आजचा दिवस २० नोव्हेंबर २०२४ हा निश्चितच तुमच्या आमच्यासाठी लोकशाहीचा उत्सव असून हा दिवस आपल्या परिवारासाठी राखीव ठेवा,सकाळी लवकर मित्र - परिवार या सह लोकशाहीचा उत्सव चालु असलेल्या मतदान केंद्रावर जा आणि सद सदविवेक बुध्दी जागृत ठेवून 'आपले मतदान आपला हक्क' आहे याची जाणीव ठेवून कुठल्याही भुलथापांना....कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा ही तुम्हाला विनंती आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या