🌟पुर्णेकरांनों लक्षात ठेवा ही आम्हा पुर्णेकरांसाठी अखेरची करों याफीर मरोंची लढाई आहे 'अभी नहीं तो कभी नहीं'.....!


🌟पुर्णेत महाविकास आघाडी उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेस संबोधित करतांना बि.आर देसाई म्हणाले🌟  


पुर्णेकरांनों लक्षात ठेवा ही आम्हा पुर्णेकरांसाठी अखेरची करों याफीर मरोंची लढाई आहे 'अभी नहीं तो कभी नहीं' गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांच्या रुपात एकमेव विकासाभिमुख नेतृत्व आपल्यासमोर उभे आहे.

पुर्णा तालुक्यातील बेरोजगारीचा भस्मासुर नष्ट करुन नवीन उद्योग व्यवसायांसह कारखानदारी उभारुन तरुणांच्या सर्वागीण विकासासाठी भूमिपुत्र असलेल्या विशाल कदम हा सर्वार्थाने अष्टपैलू उमेदवार आहे त्यांच्या रुपातील तरुण तडफदार नेतृत्व आपल्या क्षेत्रातील जनहीताचे प्रश्न विधिमंडळात प्रश्न मांडण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला तारखेला निवडणूक निशाणी मशालचे बटन दाबून पुर्णा-पालम-गंगाखेड मतदार संघाचे नशीब उजळवण्याचा दुग्धशर्करा योग आहे परिसर्तील बेरोजगारी,बाजारपेठेची परिस्थिती, शहराची बकाल अवस्था, शहरातील होणारे युवकांचे स्थलांतर हे मुद्दे दुर करण्यासाठी आपल्याला परिवर्तन करून देणाची क्षमता असलेल्या विशाल कदम यांना विधानसभेत पाठवण्याची २० नोव्हेंबरला मशाल चिन्हावर बटण दाबून आपला हक्काचा आमदार निवडून द्यावा असे प्रतिपादन पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य बालाजी देसाई यांनी आज पुर्णेत महाविकास आघाडी उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित महा जनसंपर्क पदयात्रेस संबोधित करतांना केले....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या