🌟आसपासच्या शेतकऱ्यांसह गावखेड्यांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : कारखान्याची मान्यता रद्द करण्याची होतेय मागणी🌟
पुर्णा [दि.१३ नोव्हेंबर २०२४] :- पुर्णा तालुक्यातील कानखेड शिवारातील रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यातून प्रचंड प्रमाणात सुटणाऱ्या दुर्गंधीसह कारखान्यातून परिसरात सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसह आसपासच्या गावखेड्यांतील ग्रामस्थ देखील अक्षरशः त्रस्त झाले असून कानखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या कारखान्याला कानखेड ग्रामपंचायत प्रशासनाने नेमकी ॲग्रो फुडस निर्मितीसाठी नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले की हड्डी कारखान्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले की मानवी जिवनात उपयुक्त असलेल्या शेकडों जनावरांच्या कत्तलखान्यासाठी एनओसी दिली ? या प्रश्नाचे उत्तर कानखेड ग्रामपंचायत प्रशासनाला विचारण्याची वेळ आता आलेली आहे कारणं या रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्यामुळे कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसह आसपासच्या गावखेड्यांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्यात दररोज नियमबाह्य पद्धतीने शेकडो दुभती/गाभन जनावर निर्दैयीपणे कापली जातात परंतू कानखेड ग्रामपंचायत प्रशासनापासून ते पुर्णा तालुक्यातील तहसिल कार्यालयासह परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी या सर्वांनाच 'मॅनेज करुन' आपण हा रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणारा जनावरांचा कत्तलखाना चालवत असल्यामुळे आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही असे आवर्जून सांगत संबंधित कारखाना चालक निर्दैयीपणे प्रतिरोज चार/पाचशे मानवी जिवनात उपयुक्त असलेल्या दुभत्या/गरोदर म्हशींसह वासरांची तर कत्तल तर करीतच आहे याशिवाय कामगारांच्या हक्क आणि अधिकारांची देखील सातत्याने हत्या करतांना पाहावयास मिळत आहे.
रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्यात पश्चिम बंगाल/आसाम/नागालँड/बिहारसह इतर राज्यांतील हजारो महिला/पुरुषांसह अल्पवयीन बाल कामगार असून या कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा नाही एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास त्याला काहितरी आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने त्यांच्या कुठल्याही प्रकारचा सुरक्षा विमा करण्यात येत नाही त्यांच्या खाण्यापिण्यासह त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था नाही याशिवाय त्यांच्याकडून अठरा अठरा तास काम करून घेतले जाते परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा टिए/डिए नाही याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे त्यांना वेळेवर वेतन सुध्दा दिले जात नाही परंतु संबंधित कामगार परराज्यातील व कामगार पुरवठा करणाऱ्या गुत्तेदारांच्या माध्यमातून आलेले असल्यामुळे त्यांचा कोणीही वाली नसल्याचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांचे आर्थिक/मानसिक व शारीरिक सोशन केल्याचे गंभीर प्रकार या कारखान्यात सातत्याने घडत असतांना पहावयास मिळतात.
सरकारी नियमाप्रमाणे व कामगार कायद्याप्रमाणे या कारखान्यात ८० टक्के कामगार स्थानिक असायला हवे परंतु स्थानिक कामगार मोठ्या प्रमाणात भरती केले तर आपला गैरकारभार उघडकीस येईल या भितीपोटी रिलॅबल अग्रो फुडस कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक स्थानिक कामगारांना डावलून परराज्यातील कामगारांचा भरणा मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे स्थानिक कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे स्वच्छता पंधरवडा निमीत्त रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखाना प्रशासनाने आज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वच्छता मोहिम राबविण्याचे नाट्य जरी रंगवले असले तरी या रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्यातील दुर्गंधीमुळे आसपासच्या गावपरिसरातील जनजीवन अस्तव्यस्त झाले असून आसपासच्या शेतकऱ्यांसह गावखेड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे या रिलॅबल अग्रो फुडस कंपनीच्या नावावर चालणाऱ्या जनावरांच्या कत्तलखान्याचे नाहरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तात्काळ रद्द करण्याचे आदेश कानखेड ग्रामपंचायत प्रशासनाने देऊन कारखान्याची मान्यता रद्द करावी अशी मागणी आसपासच्या गावखेड्यांतील ग्रामस्थांकडून होत आहे.......
0 टिप्पण्या