🌟याप्रकरणी माधव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस स्थानकात अज्ञात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल🌟
नांदेड (३० नोव्हेंबर २०२४) - नांदेड शहरातील वसंत नगर परिसरातून दुचाकीवर जाणाऱ्या एका इसमास अडवून चाकुचा धाक दाखवत त्याच्या जवळील ०२ लाख रुपयाची बॅग हिसकावून घेतल्याची घटना काल दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेतील फिर्यादी माधव किशनराव मोरे वय ४२ राहणार मगनपूरा नांदेड हे दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना वसंतनगर कॉर्नर जवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी दुचाकी अडविली माधव मोरे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली यावेळी आरोपींनी मोरे यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील ०२ लाख रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेवून आरोपी पळून गेले. याप्रकरणी माधव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस स्थानकात अज्ञात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभाष माने हे करीत आहेत......
0 टिप्पण्या