🌟चारही निरीक्षक मतमोजणीच्या प्रारंभापासून अंतीम निकाल लागेलपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार🌟
परभणी (दि.२१ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील परभणीसह जिंतूर पाथरी गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी करीता निवडणूक आयोगाने चार निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात उच्चपदस्त अधिकारी संजयकुमार मिश्रा यांची,परभणी विधानसभा मतदारसंघात उच्चपदस्त अधिकारी के.हरिता,गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उच्चपदस्त अधिकारी संचिता बिष्णोई तर पाथरी विधानसभा मतदारसंघात उच्चपदस्त अधिकारी ज्योती राय यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे चारही निरीक्षक मतमोजणीच्या प्रारंभापासून अंतीम निकाल लागेलपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.....
0 टिप्पण्या