🌟पाथरी तालुक्यातील योगेश्वरीच्या मुहूर्ताची मोळी पडली : आज पासुन गाळपाची चाके सुसाट फिरणार.....!


🌟संचालक एम.टी.नाना देशमुख यांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पुजन व मोळी टाकून २३ व्या गळीत हंगामाची सुरुवात🌟


प्रतिनिधी 

पाथरी :- पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या गाळप हंगामाची पहिली मोळी बुधवार १३ नोव्हेंबर रोजी एम टी नाना देशमुख यांच्या हस्ते विधिवत पुजना नंतर गव्हाणीत टाकून मुहूर्त साधला असून पुढील चार ते पाच महिने ऊस गाळपा साठी या साखर कारखाण्याची चाके सुसाट चालतील अशी अपेक्ष व्यक्त होत आहे आज झालेल्या २३ व्या गळीत हंगामाच्या मुहुर्ताच्या कार्यक्रम प्रसंगी माजलगावचे माजी आमदार तथा या साखर कारखाण्याचे चेअरमन आर टी देशमुख जिजा,कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख भैय्यासाहेब,जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, प्रमोटर लक्ष्मिकांतराव घोडे, सुदामराव सपाटे,तुषार देशमुख,शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे.बबनराव सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.


या वर्षी चांगले पाऊसमान झाल्याने ऊसाची उपलब्धता चांगली असून एकरी उतारा ही समाधानकारक मिळेल अशी आशा शेतकरी वर्गात दिसुन येत आहे. योगेश्वरी शुगर्स प्रतिदिन दोन हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप करते. ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासत असल्याने या वर्षी या साखर कारखाण्याच्या वतीन पाच ऊस तोडणी यंत्राची व्यवस्था केली असून किमान साडेतीन ते चार लाख मे टन ऊसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे या सोबतच या वर्षी जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले अजून गोदावरी नदी वरील बंधारे ही पुर्ण क्षमतेने भरले असून जमिनीतील पाणी पातळी वाढलेली आहे.त्या मुळे विहिरी कुपनलीकांना मुबलक पाणी असल्याने शेतक-यांचा कल हा प्राधान्याने ऊस लागवडी कडे असल्याने पुढील वर्षी हा साखर कारखाना प्रतिदिन चार हजार पाचशे मेट्रिकटन गाळप करण्या साठी व्यवस्थापण मंडळ आता पासुनच प्रयत्न करत असून शेतक-यांनी दर्जेदार ऊसाची लागवड करण्याचे आवाहन शेतकी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी काटा पुजन आणि प्रथम ऊस देणा-या शेतक-याचा सत्कार करण्यात आल्यानंतर गव्हाणीचे एम टी नाना देशमुख यांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पुजन करण्यात आल्यानंतर गव्हाणीत मोळी टाकून प्रत्यक्ष २३ व्या गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली.


या वेळी चेअरमन आर टी देशमुख जिजा,कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख भैय्यासाहेब,जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, प्रमोटर लक्ष्मिकांतराव घोडे, सुदामराव सपाटे, तुषार देशमुख, बबनराव सोळंके, कारखान्याचे अधिकारी श्रीहरी साखरे, नवनाथ चौधरी, राजकुमार तौर,चंद्रकांत मुखरे , रामराव कदम, नंदीप भंडारे तसेच ऊस उत्पादक शेतकरी सुधाकरराव पौळ, वाघाळा येथील ऊस उत्पादक शेतकरी किरण  घुंबरे  सुशील घुमरे, कार्तिक घुंबरे, दिगंबराव मोकाशे ,वाघाळा गावचे माजी सरपंच राजेंद्र घुंबरे, भागवतराव नागरगोजे, सौरभ नागरगोजे,योगेश नवघरे,परमेश्वर नवघरे,मोहा गावचे सरपंच पांडुरंग शेप , उपसरपंच संदीप देशमुख, बिभिषण  देशमुख, दशरथ शिंदे, बब्रुवान शिंदे, बोडखा गावचे सरपंच सुग्रीव तिडके, लिंबा गावचे माजी सरपंच शेख मुस्ताक, पं. स. माजी सदस्य लक्ष्मणराव दुगाने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, दत्ता धर्मे, कल्याणराव देशमुख, मोहनराव देशमुख, हिवरा गावचे सरपंच नितीन निर्मळ, सिद्धेश्वर गिरी मंकाजी शिंदे अमोल लांडगे कारखान्याचे अधिकारी, कामगार कर्मचारी ऊसतोड वाहतूक ठेकेदार इत्यादी उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार कार्यालयीन व्यवस्थापक राजकुमारसिंह तौर यांनी मानले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या