🌟सामाजिक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते तुकाराम बारहाळीकर यांना संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्कार....!


🌟राज्यस्तरीय संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्कार 30 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार प्रदान🌟                  

नांदेड :- सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करत सामाजीक चळवळीमध्ये काम करणारे भारतीय लहुजी सेनेचे नवनिर्वाचीत नांदेड जिल्हासंघटक बारहाळी सर्कल येथील कणखर,स्वाभिमानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकारामदादा बारहाळीकर यांना क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जन्म उत्सव सोहळा निमित्य दि.30 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे "राज्यस्तरीय संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. 

                   सदर पुस्कार हा राज्यस्तरीय असल्यामूळे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील समर्पित भावनेने स्वत:चे आयुष्य समाजसेवेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे गुणगौरव करून त्यांना अधिक प्रेरणा उर्जा मिळण्यासाठी त्यांनी केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेवून परिवर्तनवादी चळवळीत भरीव योगदान असणारे चळवळीचे कार्यकर्त म्हणून परिचीत आहेत. त्यांनी मुखेड तालुक्यातील  जात निर्मूलन करण्यासाठी मोठा लढा  उभाकरून प्रस्थापीत व्यवस्थेशी संघर्ष देत दलित समाजाचे सरंक्षण केल्याचे अनेक गावातील घडलेल्या घटनाचा लोखजोखा आहे. तसेच गायरान धारकांचा शेतजमीनीचा प्रश्न शासन दरबारी तीव्र लढा देवून शेतजमीन नावे करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून सदरील पुरस्कार अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार असल्या कारणाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.     

                           सदर पुरस्कार मिळाल्या प्रसंगी त्यांचे भारतीय लहुजी सेनेचे मार्गदर्शक मा. व्हि. जी. रेड्डी साहेब, मा.आ. अविनाशजी घाटे साहेब, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. रणजीतदादा बारहळीकर, मराठवाडा प्रमुख गणपतराव गायकवाड, कायदेविषयक सल्लागार ॲड. लक्ष्मीकांत दुधकवडे, मराठवाडा युवा अध्यक्ष अमोल बारहाळीकर, जिल्हा सल्लागार संजय वाघमारे, जिल्हा सल्लागार आनंद थोटवे, जिल्हा सचिव नामदेव गवलवाड, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष के.एम. दहीकांबळे, तालुका अध्यक्ष विनोद अंधुरे, युवा तालुका अध्यक्ष प्रेम घायाळे, उपाध्यक्ष  शेषराव वाघमारे, देविदास गवलवाड, बालाजी कमळीकर, मारोती करळे, रामदास गवलवाड आदीनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या