🌟अन् आपल्या मताधिकाराचा वापर करुन निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींना खालील प्रश्नांची उत्तरं केव्हा विचारणार ?🌟
(पुर्णा जंक्शनच्या हक्काचे डिआरएम ऑफिस नांदेडला)
🔴पुर्णा रेल्वे जंक्शनच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाची सन २००२ साली नांदेडला स्थापणा तर पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रखर विरोध असतांना देखील सन २०१५/१६ साली रनिंग स्टॉफची क्रु-बुकींग लॉबीचे नांदेडला स्थलांतर केले जात असतांना आपण या विरोधात परखडपणे आवाज का उठवला नाही ❓
(पुर्णा जंक्शनच्या हक्काची अनेक महत्वाची कार्यालय नांदेड)
🔴पुर्णा जंक्शन स्थानकावरील अनेक महत्त्वाची उपविभागीय रेल्वे कार्यालय नांदेडला स्थलांतरीत करण्याचा जोरदार सपाटा सुरू असतांना जनमतातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून आपण या विरोधात राज्याच्या विधानसभा/विधान परिषदेसह देशाच्या लोकसभेत आवाज का उठवला नाही ❓
(पुर्णा जंक्शनच्या हक्काचा मराठवाडा रेल्वे कोच निर्मिती कारखाना लातूरला)
🔴पुर्णा रेल्वे जंक्शन येथे रेल्वे प्रशासनाची शेकडो एकर जमीन तसेच शेकडो निवासस्थानासह कार्यालयाच्या असंख्य इमारती तसेच सर्व सुखसुविधांसह मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था असतांना देखील पुर्णा जंक्शनच्या हक्काचा 'मराठवाडा रेल्वे कोच निर्मिती कारखाना रेल्वे मंत्रालयाकडून परभणी जिल्ह्यातील पुर्णा जंक्शन ऐवजी लातूरला निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असतांना याविरोधात आपण परभणी जिल्ह्यातील जनमतातून निवडून आलेले एक जनहितवादी जागृक लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवण्याऐवजी मुग गिळून गप्प बसलात ही आपली भुमिका संशयास्पद नव्हें काय ❓
🔴पुर्णा रेल्वे जंक्शन येथे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सन २०१३ यावर्षी परभणी जिल्ह्याचे तत्कालीन खासदार ॲड.गणेशराव दुधगावकर असतांना रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसह सर्वसामान्य जनतेच्या उपचारासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला मंजुरी दिली या हॉस्पिटलसाठी जागेचे मोजमाप देखील झाले त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला मंजुरी मिळाल्यानंतर देखील त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटची पुर्णेत स्थापना का करण्यात आली नाही या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटचे नंतर काय झाले ❓
🔴पुर्णा रेल्वे जंक्शन इंग्रज/निजाम राजवटीपासून दक्षिण मध्य रेल्वे विभागातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे रेल्वे जंक्शन या रेल्वे जंक्शनचे महत्व कमी करण्याच्या षडयंत्राच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील चुडावा ते हिंगोली जिल्ह्यातील मरसूळ अशा 'चुडावा-मरसूळ' बायपास लोहमार्गाला पुर्णा जंक्शन येथे कुठल्याही प्रकारचा थांबा न देता रेल्वे मंत्रालय मंजुरी देत असतांना परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने आपण विधानसभा/विधान परिषद व लोकसभेत आवाज का उठवला नाही ❓
🔴पुर्णा शहरासह तालुक्यात मागील तिन दशकांपूर्वी सर्वसामान्य कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे अनेक उद्योग होते ज्यात चार पाच कॉटन मिल तीन चार ऑईल मिल दोन तीन पोहा/मुरमुरा फॅक्टरी सारखे अनेक उद्योग होते या उद्योगांना वाचवण्याच्या दृष्टीने आपण काय काय उपाययोजना केल्यात ? उद्योग व्यवसायासह औद्योगिक वसाहतींच्या नावावर मिळवलेल्या जमीनीचा वापर स्वतःच्या खाजगी संपत्तीत वाढ करण्यासाठी तर केला नाहीत ना ❓
🔴पुर्णा तालुक्यात सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक कुटुंबातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने आपण आजपर्यंत एक जनहितवादी लोकप्रतिनिधीची भुमिका साकार करीत उद्योग व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने कोणकोणती पर्यायी व्यवस्था केली ? जर केली नाही तर यापुढे तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने काहीतरी करण्याची आपली इच्छा आहे किंवा नाही ❓
🔴पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात बाहेरील उद्योजकांनी बळीराजा साखर कारखान्यासह रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर भव्य कत्तलखान्याची निर्मिती केली या दोन्ही कारखान्यांमध्ये शासकीय नियम व कामगार कायद्याप्रमाणे ८० टक्के स्थानिक कामगारांना प्राधान्य देणे आवश्यक असतांना संबंधीत कारखान्याच्या मुजोर प्रशासनाने परजिल्ह्यासह परराज्यातील कामगारांचा जवळपास ८० टक्क्यांच्या वर भरणा करीत स्थानिक कामगारांच्या हक्क व अधिकारांवर गधा आणत स्थानिक कामगारांची मुस्कटदाबी चालवली असतांना आपण कारखाना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणा विरोधात आवाज का उठवला नाही ? आपली ही भुमिका प्रस्थापित उद्योजकांच्या हिताची व स्थानिक कामगारांवर अन्याय करणारी नाही काय ❓
पुर्णा शहरासह तालुक्यातील किरकोळ वादाला जातीय दंगलीचे स्वरूप देऊन असंख्य निरपराध तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर एमपीडी ॲक्ट/संघटीत गुन्हेगारी कायद्यासह अनेक गंभीर गुन्हे सुडभावनेतून दाखल केले जात असतांना तुम्हीं आपण या तरुणांचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्यात ? गलिच्छ राजकारणाला बळी पडलेल्या अनेक तरुणांना वाचवण्यासाठी आपण त्यांना मानसिक आधार देऊन न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वकील लावण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले काय ? तरुणांच्या उध्वस्त भविष्यावर सत्ता प्राप्तीच्या गलिच्छ राजकारणाची सुत्र अवलंबून तर नाही ना ❓
0 टिप्पण्या