🌟उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 94 शिलेदारांपैकी 16 जणांचा विजय ; महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही - उध्दव ठाकरे 🌟
💫 राज्यातील मतदारांचा महायुतीला स्पष्ट कौल, महायुतीने तब्बल 234 जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव, फक्त महाविकास आघाडी 49 जागांवर विजयी
💫 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची 57 जागांवर आघाडी, 2014 आणि 2019 च्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश,भाजप यंदा 135 पार; राज्यात पवार पॅटर्न फेल,शरद पवारांनी राज्य पिंजून काढले पण तुतारी वाजलीच नाही,राज्यात शरद पवारांना फक्त 14 जागांवर आघाडी
💫 उद्धव ठाकरेंना मोठा धक्का,94 शिलेदारांपैकी 16 जणांचा विजय ; महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, कोणत्या रागापोटी ही लाट उसळली हे समजत नाही, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
💫 बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूरांसह काँग्रेसचे बडे चेहरे पराभूत, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील अनेक नेत्यांना धक्का,तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय
💫 राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 25 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार शपथविधी ; महायुतीचा मुख्यमंत्री कोण बनणार याची उत्सुकता शिगेला, जास्त जागा हा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट ; मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्याने यश मिळाल्याचा प्रवक्ते राजू वाघमारेंचा दावा
💫 आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत ; पराभव मान्य करावा लागेल, महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर मतदारांनी मतदान केलं की ईव्हीएमनं, आदित्य ठाकरेंचा सवाल
💫 राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा माहीममधून दारुण पराभव, शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी मारली बाजी ; माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य, मनसेच्या उमेदवारांच्या पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
💫 हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचे प्रेम,आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ; लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
💫 अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला, बारामतीमधून युगेंद्र पवारांचा 1 लाख 16 हजार मतांनी पराभव ; समान नाव आणि ट्रम्पेट चिन्हाने पवारांच्या देवदत्त निकमांचा पराभव, 'गद्दार' म्हणालेले दिलीप वळसे पाटील आंबेगावातून 1100 मतांनी विजयी
💫 कोकणात राणे बंधुंचा विजय, ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंना तब्बल 53,000 मताधिक्य ; कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार; शरद पवार गटाच्या समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव
💫 उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास स्वागत, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, उद्धव ठाकरे भाजपचे नैसर्गिक मित्र असल्याचा पाटलांचा दावा
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या