🌟जिंतूर विधानसभेच्या महायुती उमेदवार आ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन🌟
जितूर (दि.१५ नोव्हेंबर २०२४) : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजाताई मुंडे यांची उद्या शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता जिंतूर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आमदार पंकजाताई मुंडे या शनिवारी सकाळी १०.०० वाजता जिंतूरात दाखल होणार असून जिंतूर शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात त्यांची भव्य सभा होणार आहे. यावेळी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.....
0 टिप्पण्या