🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील खर्च सादर न केलेल्या दोन उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस....!


🌟अशी माहिती पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली🌟

परभणी (दि.१५ नोव्हेंबर २०२४) : विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या तपासणीसाठी खर्च सादर न केलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.

                 पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च निरीक्षकाकडे दि.१४ नोव्हेंबर रोजी दुसर्‍या तपासणीसाठी खर्च सादर करणे बंधनकारक होते परंतु खर्च सादर न केल्याने अर्जुन ज्ञानोबा भिसे व गणेशनाथ आदिनाथ जाधव या दोन उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच खर्चाची तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याने त्या दिवशी सर्वांनी आपले खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी सादर करण्याबाबत प्रत्येकास मेलद्वारे कळविण्यात आले आहे असेही लाहोटी यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या