🌟मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या धनराज गुट्टे वर कठोर कार्यवाही करा..!


🌟पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना सकल मराठा समाजाने दिले निवेदन🌟

पुर्णा (दि.१३ नोव्हेंबर २०२४) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असतांना व प्रशासकीय पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असतांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक दिवसांपासून समाजा समाजात द्वेषाची भावना पसरविण्याचे दृष्टीने फेसबुक इन्स्टाग्राम वाट्सॲपसह इतर सोशल साईट्सवर एक वादग्रस्त व्हिडिओ सातत्याने प्रसारित करण्यात येत असून त्या विडिओत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील धनराज गुट्टे नावाच्या व्यक्तीने मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे सकल मराठा समाजाची अस्मिता मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत बेताल वक्तव्य केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

यामुळे मराठा व गैरमराठा समाजात तेढ निर्माण होत आहे ही अत्यंत गंभीर बाब लक्षात घेऊन याबाबत पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी शासनाने धनराज गुट्टे वर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन आज बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांना दिले यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या