🌟लाडक्यांच्या भावनांवर मतलबाच्या पोळ्या शेकण्याची चुरस......!


🌟महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाकांक्षांची ढगफुटी होऊन आश्वासनांच्या पाऊसांची मुसळधार अतिवृष्टी सुरू🌟

✍🏻संजय एम.देशमुख,(निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,अकोला

मोबा.क्र.९८८१३०४५४६

          वर्षानुवर्षानंतर घरी आलेल्या भावाला पाहून बहिणी म्हणतात "खूप दिवसांनी बहिणीचं घर दिसलं रे राज्या..!" भाऊ म्हणतो हो ताई....तुझी एवढ्यात खूपच आठवण येत होती.शेवटी आपलं रक्ताचं नातं गं...कधी तुझा चेहरा पाहतो आणि कधी नाही असं झालं,आणि मग राहवलंच नाही म्हणून सरळ निघून आलो.मग बहिणही बिचारी भावाच्या वेड्या प्रेमात समरस होते. आनंदाने माहेरच्या सगळ्या चौकशा करता करताच लगबगीने त्याच्या पाहूणचाराची व्यवस्था करते.जेवण होते,गप्पागोष्टी होतात,आणि नंतर प्रेमळ मुखवट्यामागे दडलेला धुर्त भाऊ समोर येतो...! .म्हणतो... "ताई तुझ्याकडे भेटीसाठी यायचंच होतं,तर म्हटलं एक महत्वाचं काम आटोपून घेऊ.नंंतर भरपूर कामांमुळे लवकर भेटीचे योग येत नाहीत गं...!

    वेडी ताई म्हणते "कोणतं रे काम दादा"...भाऊ म्हणतो...."काही नाही गं ते छोटसं तुझ्या सह्यांचं....आता आपलं वय वाढत चाललंय.तु तुझ्या घरी सुखी,समृध्द आहेस.माझ्या तब्येतीमुळे पुढे माझा काही भरवसा नाही.म्हणून म्हटलं मुलांचे मार्ग मोकळे करावेत.वडीलांनी घाम गाळून मोठ्या कष्टाने जी काही शेती, घर मालमत्ता करून ठेवली, त्या हक्कनोंदींवर माझं आणि तुझंही नाव आहे.म्हटलं त्या कागदपत्रांवर  माझ्या आणि मुलांची लाडकी आत्या म्हणून तुझ्याही सह्या घेऊन ते कागद त्यांच्या सूपूर्त करावेत म्हणजे आपण दोघंही जबाबदाऱ्यांमधून मोकळे"...आत्ता कुठे बहिण भानावर आली.परंतू भावाला बोलून काय दुखवावे म्हणून सोशिक बहिनीने कोणताही गैरविचार न करता आपले उदात्त दातृत्व जागवून त्या भिकारड्या मतलबी भावाला खटाखट सह्या देऊन रवाना केले.परंतू ताकाला येऊन भांडं लपवणारा भाऊ एवढ्या वर्षानंतर कशासाठी आला हे कळायला तिला जास्त विचार करण्याची गरज पडली नाही. 

        परंतू आपल्या प्रेमाचा गैरफायदा कसा घेतला जातो,धुर्त कोल्ह्यांची सौदेबाजी कशी असते हा धडा मात्र तिला मिळाला होता.या सर्वसामान्न्य वास्तव घटनेतून महाराष्ट्रभरातील राजकारण्यांच्या आणि माझ्याही लाडक्या बहिनींनी स्वत:चा सद्विवेक जागृत करून काय धडा घ्यायचा तो घ्यावा.यामध्ये भिकारड्या भावापेक्षा बहिन दार्तृत्व,कर्त‌त्व,उदारता आणि उच्च विधायक विचारांनी असामान्न्य ठरलेली आहे.अशी उदात्त विचारांची  सुसंस्कृत महान नारीशक्ती येथील संस्कृतित विराजमान असल्यामुळे अनाचाऱ्यांच्या विश्वासघाताच्या दुष्कृत्त्याचे घडे फारच धिम्या गतीने भरले जात आहेत.     

       महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाकांक्षांची ढगफुटी होऊन आश्वासनांच्या पाऊसांची मुसळधार अतिवृष्टी सुरू आहे.अतिरेकी खोटेपणा आणि निंदानालस्त्यांचे वादळी वारे जोरात वाहू लागले आहेत.मतदारांना मुर्ख बनवणाऱ्या भुलथापा आणि भावनांना हात घालणाऱ्या ढोंगी गर्जनांचे कर्कश आवाज कानांच्या पडद्यांना भेदून जात आहेत. भाजपच्या धर्मांतर विरोधी कायदा,वर्षानुवर्षापासून तिच ती दिली जाणारी रोजगारांची आश्वासने,शेतकरी कर्जमाफी,विकासकामांच्या हनुमान शेपटीप्रमाणे लांबलचक याद्यांचे आणि भरसाट आकडेवारीचे भुलभुलय्यै भाजपपकडून नाचविले जात आहे.यातून अर्थसंकल्पाचाही विचार न करण्याचा अविचारी आणि अव्यवहार्यपणा ओसंडून वाहतांना दिसत आहे.तर यातील धर्म फक्त बाजुला ठेऊन महिला,शेतकरी आणि सर्वसामान्न्यांनासाठी जरा वेगळ्या पण रास्त भावातील चॉकलेटांचं वितरण  महाआघाडीच्या  उमेदवारांकडूनही आहे.परंतू या साऱ्या गदारोळात लाडक्या बहिनी मात्र केन्द्रस्थानी आहेत.फक्त मतांसाठी सरकारी तिजोरीची उधळपट्टी करणाऱ्या....या योजनेतून लाडक्या बहिनींच्या भावनांचे गैरफायदे घेऊन ह्या निवडणूका लढविल्या जात आहेत. थापा मारण्यात तरबेज असलेल्या महायुती उमेदवारांचा बहिणींसाठी प्रेमाचा उमाळा वाढतच चालला आहे.म्हणून आता रू.१५०० ऐवजी २१०० च्या घोषणा तर त्यावर मात म्हणून महाविकास आघाडी उमेदवार आणि नेत्यांकडून रू. ३००० करण्याची अभिवचनं वचननाम्यातून समोर येत आहेत.परंतू भाजप आणि महायुतीला  मत देणाऱ्या आणि त्यांच्याच प्रचारात सामिल होणाऱ्या बहिनींसाठीच ही योजना आहे.असशी संकुचित आणि ढोंगीपणाचं पितळ उघड पाडणारी मतलबी वृत्ती भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याने समोर आली आहे.ते म्हणतात कॉंग्रेस आणि महाआघाडीच्या प्रचारा असणाऱ्या महिलांचे फोटो काढून नावे मला पाठवा,त्यांचे योजनेचे पैसे बंद केले जातील.शासकीय पैसा म्हणजेच आपल्याच बापाची मालमत्ता म्हणून वागण्याचा किती हा भाजपचा उन्मत्तपणा...!  मतांच्या गोळाबेरजेसाठी प्रेमाच्या परीभाषा ह्या आज कर्तव्यभावना नव्हे, तर अर्थकारणातून सिध्द केल्या जात आहेत.कोण खरे उदार, प्रेमळ भाऊ आणि कोणते खोटे भाऊ हे सिध्द करण्याची चढाओढ लागली असून यात लाडक्या बहिणी मात्र संभ्रमित झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या राममंदिर,हनुमान चालिसा,जाती आणि धर्माचे मुर्ख बनवणारे मुद्दे वापरून वापरून गुळगुळीत झालेले  आहेत. ते आता नि:ष्प्रभ झाल्याची भिती निर्माण झाल्याने वोट बॕंकेवर आक्रमण करण्यासाठी महिला अत्त्याचाऱ्यांना कायद्याच्या पळवाटा उपलब्ध करून देणारांना अचानक बहिणींच्या प्रेमाचे साक्षात्कार झालेले आहेत.त्यासाठी मोदी आणि योगी हे दोन कलियुगातले भगवान सुध्दा महाराष्ट्र पालथा घालत आहेत.आता त्यांच्यामुळे पणवती लागते की, सत्त्यवानांची भत्त्याची व्यवस्था करणारी सत्तासुंदरी हातात लागते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवार आणि नेत्यांनी आपल्या जावायांना अंकित करून ठेवणाऱ्या बहिणींनीनाच सत्तेच्या मतलबासाठी हाका दिलेल्या आहेत.म्हणूनच लाडक्या बहिणींच्या घरांचे विस्मृतित गेलेले मार्ग त्यांनी अनेक वर्षानंतर शोधून काढलेले आहेत. 

           या प्रचाराच्या गजबजाटात ईतरांना विरोधकांसाठी  आचारसंहितेचे बडगे उगारणारा निवडणूक आयोग कुणाच्या ईशाऱ्यांवर काम करतो हे आता सर्वसामान्न्य मतदारांनाही समजायला लागलेलं आहे.त्यामुळे नि:पक्षपात गुंडाळून ठेऊन सोईनुसार डोळ्यांची उघडझाप करून कानांचे चलनवलनही तसेच ठेवले जात आहे.एवढ्या प्रचंड प्रमाणात आमिषांची चॉकलेटं वाटणाऱ्या राजकीय पक्षांना आचारसंहितेच्या नियमांनी नियंत्रित करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य नाही काय ? परंतू संविधान आणि कायदे तथा आचारसंहितांचे डांगोरे पिटणारा हा देश आणि आमचा महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला यावर नुसते विचार करून स्वस्थ बसणे आहे.कारण सत्ताधारीच जर विपरीत आणि मनमानी पध्दतीने वागत आहेत तर निवडणूक आयोगही हतबल आहे.कारवाई करणार कुणावर? सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांचे प्रमाद कमीच आहेत.बिघडलेल्या राजकारण्यांना पिढीजात सत्तेत राहण्याच्या महत्वाकांक्षा आणि त्यांच्या सोईसुविधांचे चोचले संविधानिक बदल करून नियंत्रित झाले पाहिजेत‌.अमेरिकेप्रमाणेच निवडणुकांमध्ये भाग घेण्याच्या मर्यादाही ठरवून दिल्या पाहिजेत.परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे तो सर्वांनी पाळलाच पाहिजे‌.नाही तर विनाश हा दुर नसतो हे सत्त्य राजकीय नेत्यांनी ओळखलं पाहिजे...स्वायत्त संस्थानीही याचं भान ठेवलं पाहिजे....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या