🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरातील अवैध गुटखा गोदामावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाची धाड....!


🌟स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ०४ लाख ७२ हजार रुपयांचा प्रतिबंधीत अवैध गुटखा साठा जप्त🌟 


परभणी :- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक अशोकराव घोरबांड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने आज सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास टाकलेल्या जबरदस्त धाडीत राज्यात प्रतिबंधीत व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला अंदाजे ०४ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीचा गुटख्याच्या साठ्यासह गुटखा साठ्याची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी एक कार असा मुद्देमाल जप्त करून अवैध गुटखा माफियांमध्ये खळबळ माजवली असून या प्रकरणी पथकातील पोलिसांनी गंगाखेड पोलिस स्थानकात दोन आरोपी विरोधात रितसर गुन्हा दाखल केला आहे. 


या संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड पोलिस स्थानकाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात राज्यात प्रतिबंधीत व मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या अवैध गुटख्याच्या विक्रीसह तस्करी होत असल्याची माहिती परभणी जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे धाडसी 'रिअल सिंघम' अधिकारी पोलीस निरीक्षक अशोकराव घोरबांड यांना मिळाली त्यांनी तातडीने कारवाई करण्यासाठी स्थागुशाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडुरंग भारती,जमादार लक्ष्मण कांगणे,राहुल परसोडे, पोलिस शिपाई परसराम गायकवाड,दिलीप निलपत्रेवार,चालक हनवते आदींच्या पथकास काल रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री पासुनच अवैध गुटखा माफियांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले मिळालेल्या आदेशानुसार स्थागुशाच्या पथकाने आज सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ०२:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील जगदंबा ट्रेडर्सच्या मागील पत्राच्या गाळ्यात एका स्विफ्ट कार मधुन गुटखा आल्याची खात्री लायक माहिती मिळवली पथकाने त्या ठिकाणी तात्काळ धाड टाकली यावेळी पथकास सुमारे ०४ लाख ७२ हजार ५०० रुपये किंमतीच्या प्रतिबंधीत अवैध केसर युक्त गोवा १००० गुटख्याच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एकूण २७ पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये एकूण ७० पाऊच असे एकूण १८९० पाऊच व गुटखा वाहतूकीसाठी वापरल्या जाणारी अंदाजे तीन लाख रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीची कार क्रमांक एमएच ४८ एफ १८९० असा एकूण ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींवर गंगाखेड पोलिस स्थानकात कलम १२३,२२३, २७४, २७५,३ (५) भारतीय न्याय संहीता सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वयें रितसर गुन्हा दाखल करून एक आरोपीस ताब्यात घेतले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या